युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी (एनडीटीएल) प्रयोगशाळेत अ‍ॅथलीट पासपोर्ट व्यवस्थापन युनिटचे उद्घाटन


हे युनिट ग्लोबल साऊथ साठी दीपस्तंभ ठरेल - डॉ. मांडवीय

Posted On: 17 APR 2025 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2025

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेत (एनडीटीएल) अ‍ॅथलीट पासपोर्ट व्यवस्थापन युनिट (एपीएमयू) चे उद्घाटन झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वच्छ आणि पारदर्शक क्रीडा पद्धतींना पाठिंबा  देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला यातून पुन्हा एकदा पुष्टी मिळते.

भारताच्या उत्तेजक विरोधी लढ्यात ए पी एम यु हा एका महत्त्वाचा टप्पा असून त्या माध्यमातून खेळाडूंच्या जैविक पासपोर्ट (एबीपी) प्रणालीद्वारे खेळाडूंच्या बायोलॉजिकल प्रोफाइलचा  मागोवा विश्लेषण आणि पाठपुरावा करणे शक्य होते.  या अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणेमुळे उत्तेजक द्रव्य विषयक प्रारूपाचा शोध लागेल आणि अनैतिक पद्धती ओळखून क्रीडाक्षेत्र अधिक निष्पक्ष होईल, असे मांडवीय यावेळी म्हणाले.

ए पी एम यु हा ग्लोबल साऊथसाठी दीपस्तंभ ठरू शकतो असे सांगून मांडवीय म्हणाले की अशा प्रकारच्या यंत्रणा उभारण्यासाठी पुरेसे स्रोत उपलब्ध नसलेल्या शेजारील राष्ट्रांना याचा मोठा लाभ होऊ शकतो. ज्ञान आणि उपकरणे सामाईक करुन भारत या राष्ट्रांना त्यांचे क्रीडाक्षेत्र चुकीच्या पद्धतींपासून मुक्त ठेवण्यात मदत करु शकतो, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे उपक्रम एकतेच्या भावनेला अधोरेखित करतात आणि ग्लोबल साऊथमधील क्रीडाक्षेत्राचे अखंडत्व  मजबूत करण्यास हातभार लावतात”, असेही ते म्हणाले.

प्रादेशिक सहकार्यामधील क्षमतेवर भर देऊन मांडवीय यांनी ए पी एम यु च्या माध्यमातून भारत शेजारील राष्ट्रांना कौशल्य आणि संसाधने सामायिक करण्याची भारताची तयारी त्यांनी अधोरेखित केली. उत्तेजक द्रव्य आणि यासंदर्भात लवकर शिक्षण देण्यासाठी क्रीडा प्राधिकरणे, संस्था, विद्यापीठे आणि संघटनांनी काम करण्याची गरज असून ग्रामीण भागात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तेजकांबद्दल अधिक संवेदनशील करण्याच्या उद्देशाने प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी विविध शाळा/विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना उत्तेजक  विरोधी शिक्षण द्यावे असेही त्यांनी सुचवले.

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी (एनडीटीएल) प्रयोगशाळेने जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी  एजन्सी,वाडाच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगतरीत्या ए पी एम यु ची रचना केली आहे, ज्यामुळे उत्तेजक विरोधी कार्यक्रमाचा जागतिक स्तरावर प्रसार होईल. कालांतराने रक्त आणि स्टेरॉइडल प्रोफाइल सारख्या निकषांचा मागोवा घेऊन, हे युनिट  प्रामाणिक खेळाडूंची विश्वासार्हता जपेल आणि खेळांमध्ये सर्वांना समान संधी आणि लाभ मिळतील हे सुनिश्चित होईल.

भारतात स्थापन झालेले हे युनिट जगातील 17 वे अॅथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट आहे ही उल्लेखनीय बाब आहे.  हे युनिट  अॅथलीट्सच्या जैविक पासपोर्टवर देखरेख  आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेली एक विशेष संस्था म्हणून काम करेल.

आंतरराष्ट्रीय  क्रीडा मंचावर भारत सातत्याने चमकदार कामगिरी करत असताना, जगभरात नैतिक क्रीडा पद्धतींचा एक मापदंड स्थापन करण्यात तसेच क्रीडाक्षेत्रात निष्पक्षता आणि अखंडत्व राखण्यात ऍथलीट पासपोर्ट व्यवस्थापन युनिट, देशाच्या दृढ समर्पणाला अधोरेखित करते.

 

पार्श्वभूमी 

शास्त्रज्ञांनी डोपिंग किंवा उत्तेजक द्रव्यांचे सेवन शोधण्यासाठी रक्तातील परिमाणांचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीचा शोध लावला तेव्हा अ‍ॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट" ही संकल्पना उदयास आली. जैविक पासपोर्ट हा एक इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आहे जो कालांतराने खेळाडूच्या जैविक परिमाणांचा डेटा संकलित करतो. रक्तातील विविध घटकांबद्दलची माहिती, संप्रेरकांची  पातळी आणि इतर शारीरिक परिमाण  यासारख्या घटकांचा मागोवा घेऊन, ए पी एम यु प्रतिबंधित पदार्थांना थेट न ओळखता डोपिंगचे संकेत देणारी कोणतीही विसंगती उघड करु शकते.

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2122530)