संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त युद्धाभ्यास केंद्राद्वारे नवी दिल्लीत 'कलम आणि कवच 2.0' या संरक्षण साहित्य महोत्सवाचे आयोजन

Posted On: 15 APR 2025 5:15PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयांतर्गत संयुक्त युद्धाभ्यास केंद्राने पेंटागॉन प्रेसच्या सहकार्याने नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे संरक्षण साहित्य महोत्सव 'कलम आणि कवच 2.0' च्या दुसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन केले. 'संरक्षण सुधारणांद्वारे भारताचा उदय सुरक्षित करणे' ही यावर्षीची संकल्पना होती.

15 एप्रिल 2025 रोजी आयोजित या कार्यक्रमात विशेषतः संरक्षण उत्पादनाच्या संदर्भात संरक्षण तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्धतंत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' या आवाहनाशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमात अधिग्रहण आणि खरेदी सुधारणांचे प्रमुख पैलू उलगडण्यात आले.

या कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सशस्त्र दलातील नामवंत तज्ञ, रणनीतीक धोरणकर्ते, उद्योग धुरीण आणि डोमेन तज्ञ एकत्र आले होते. यावेळी तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्धतंत्र; आधुनिक लष्करी कारवायांमध्ये एआय, सायबर तंत्रज्ञान, क्वांटम कंप्युटिंग, ड्रोन, अंतराळ तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टरची भूमिका; संरक्षण उत्पादन आणि आत्मनिर्भरता, अधिग्रहण आणि खरेदी सुधारणा यासह अनेक अत्याधुनिक विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा, कूटनीती  आणि विकासासाठी एक धोरणात्मक रूपरेषा तयार करण्यावर भर देण्यात आला. त्यात विशिष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब, जमीन, हवाई, समुद्र, सायबर आणि अंतराळ यासह बहु-क्षेत्रीय आणि आंतर-क्षेत्रीय परिचालन क्षमता वाढवण्यावरील प्रगतीचा समावेश होता. समकालीन सागरी सुरक्षा प्रतिमान, भविष्यातील आव्हाने आणि लढाऊ क्षमता वाढवण्याचा पुढील मार्ग देखील कार्यसुचीत समाविष्ट होता.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2025 हे वर्ष 'सुधारणांचे वर्ष' म्हणून घोषित केले, जे सशस्त्र दलांना तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, लढाऊ-सज्ज दलात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनकारी वर्ष आहे. ही दूरदृष्टी बहु-क्षेत्रीय, एकात्मिक कार्यान्वयासाठी देशाची बांधिलकी अधोरेखित करून संरक्षण सुधारणांसाठी मिशन-मोड दृष्टिकोनावर भर देते, तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करते आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी सुधारते.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121918) Visitor Counter : 35
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil