माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज  मीडिया नोंदणीची अंतिम उलट गणना: सबमिट बटण दाबण्यासाठी अवघे  5  दिवस शिल्लक

Posted On: 11 APR 2025 5:19PM by PIB Mumbai

 

आम्हाला माहित आहे तुम्ही अर्ज भरायला  सुरुवात केली  ... त्यानंतर तुम्ही तो पूर्ण करू शकला नाहीत . मात्र एक  चांगली बातमी आहे - आम्ही स्वतः ते करून पाहिले आणि ओळखा पाहू काय असेल ? "सबमिट " बटण दाबण्यासाठी केवळ 10  मिनिटे लागली!

तर येथे एक चेकलिस्ट आहे जी तुम्हाला सुरुवात करण्यापूर्वी तयारी करण्यास मदत करेल. या पाच गोष्टी तयार ठेवा. क्लिक करा, अपलोड करा आणि पूर्ण झाले.  त्यामुळे याला सामोरे जाऊया. .. जर आपला एकाग्रता कालावधी एका रीलपेक्षा कमी असेल, तर आपण चालढकल करण्याचा  धोका पत्करू नये!

पुन्हा तुम्ही फॉर्मकडे दुर्लक्ष करण्यापूर्वी.... ही तुमची चेकलिस्ट आहे

✅ सरकारने जारी केलेली ओळखपत्रे (ड्रायव्हिंग लायसन्स, आधार, पॅन, पासपोर्ट इ.)

✅ पासपोर्ट आकाराचा फोटो

✅ कामाचे नमुने (लिंक्स, स्क्रीनशॉट किंवा क्लिपिंग्ज – 10  पिसेस

✅ व्हिसा दस्तावेज  (केवळ आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी)

✅ माध्यमांशी  संलग्न असल्याचा पुरावा

  • नोकरी करत असल्यास: संस्थेचे ओळखपत्र  + संपादकांचे पत्र / पीआयबी किंवा राज्य मान्यता कार्ड
  • फ्रीलान्सरअसल्यास: स्वयं -घोषणा पत्र (पीआयबी/राज्य मान्यता कार्ड असल्यास ते देखील  जोडा.

*पीआयबी किंवा राज्य मान्यता कार्ड सारखी अतिरिक्त सहाय्यक कागदपत्रे सादर केल्यामुळे तुमच्या अर्जाला मजबुती मिळेल आणि जलद पडताळणी होण्यास मदत होऊ शकेल.

एकदा हे तयार झाले की, लगेच https://app.wavesindia.org/register/media वर जा आणि तुम्ही  सज्ज आहात.

हो, आम्ही या बातमीतील शब्द देखील मोजले आहेत - जेणेकरून तुम्ही ते त्वरित वाचून तुमचा अर्ज 10  मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण करू शकाल. जर तुम्हाला अजूनही हा अर्ज रसायनशास्त्राइतकाच गोंधळात टाकणारा वाटत असेल, तर काळजी करू नका.... आम्हाला pibwaves.media[at]gmail[dot]com वर  लिहा (विषय: "वेव्हज मीडिया अ‍ॅक्रिडेशन क्वेरी") आणि आम्ही तुम्हाला यात मदत करू.

तुम्ही पात्र आहात की नाही किंवा नेमके काय अपलोड करायचे याबाबत अजूनही संदिग्ध आहात ? आम्ही तुमच्यासाठी मीडिया अ‍ॅक्रिडेशन धोरणाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले  आहे. येथे सर्व काही एका दृष्टीक्षेपात आहे.

i) कोण नोंदणी करू शकते?

जर तुम्ही :

  • पत्रकार (प्रिंट, टीव्ही, रेडियो)
  • छायाचित्रकार / कॅमेरापर्सन
  • फ्रिलान्स मीडिया प्रोफेशनल
  • डिजिटल कंटेंट क्रिएटर (यूट्यूबर, इंस्टाग्रामर, वगैरे )

II) जास्त नाही! फक्त ही  5 कागदपत्रे

 

माध्यम प्रकार

आवश्यक कागदपत्र

मान्यताप्राप्त प्रसार माध्यमांवर (वार्ताहर/पत्रकार/छायाचित्रकार/कॅमेरा पर्सन) म्हणून कार्यरत

संस्थेचे ओळखपत्र आणि संपादकांचे नामांकन पत्र
 किंवा
 पीआयबी किंवा राज्य मान्यता कार्ड

सरकारी ओळखपत्र

कामाचे 10 नमुने (तुमच्या कामाच्या बायलाइन किंवा लिंक्स)

छायाचित्र

वैध व्हिसा कागदपत्र (फक्त आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी)

फ्रीलान्सर्स

स्व-घोषणा पत्र

पीआयबी किंवा राज्य मान्यता कार्ड (ऐच्छिक)

कामाचे 10 नमुने (तुमच्या कामाच्या बायलाईन किंवा लिंक्स)

सरकारी ओळखपत्र

छायाचित्र

वैध व्हिसा कागदपत्र (फक्त आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी)

*पीआयबी किंवा राज्य मान्यता कार्ड सारखी अतिरिक्त सहाय्यक कागदपत्रे सादर केल्यास तुमच्या अर्जाला बळकटी  येईल आणि पडताळणी प्रक्रिया जलद होईल.

 

III) नोंदणीची अंतिम तारीख

15 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:59 (IST) पूर्वी अर्ज करा

अर्ज संमत झालेल्या  प्रतिनिधींना ईमेलद्वारे सूचित केले जाईल आणि वेळोवेळी माहिती मिळावी या उद्देशाने  एका समर्पित व्हाट्स अॅप ग्रुपमध्ये सहभागी केले जाईल.

❌ दुहेरी नोंदणी करण्यास परवानगी नाही. तुमच्या प्राथमिक कामाच्या प्रोफाइलवर आधारित फक्त एकच श्रेणी निवडा.

• प्रत्येक टप्प्यावरील अपडेट्ससाठी अधिस्वीकृती प्राप्त झाल्यानंतर व्हाट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.

• काही कार्यक्रम ऑफिशियल टीमपुरते मर्यादित असू शकतात किंवा विशेष अधिकार असू शकतात. माहिती अगोदर शेअर केली जाईल.

• पत्रकार परिषदा आणि प्रदर्शने सर्व अधिस्वीकृती प्राप्त माध्यमांसाठी खुली असतील.

• नकार टाळण्यासाठी सर्व माहिती अचूक आणि पूर्ण असणे आवश्यक आहे.

वेव्ह्ज मध्ये सहभागी होण्याची संधी चुकवू नका.

वेव्ह्ज संबंधी

केंद्र सरकारने महाराष्ट्रात, मुंबई येथे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद म्हणजेच वेव्हज आयोजित केली असून हा कार्यक्रम माध्यमे आणि मनोरंजन  क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

तुम्ही या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आहात  अथवा, गुंतवणूकदार, सर्जक अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे आहात , या शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडले जाण्यासाठी, सहयोगासाठी, नव्या संशोधनासाठी आणि माध्यमे आणि मनोरंजन  क्षेत्रात योगदान देण्यासाठी अनोखा जागतिक मंच उपलब्ध होईल.

आशय  निर्मिती, बौद्धिक मालमत्ता आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत वेव्हज हा उपक्रम भारताची सर्जनशील क्षमता वाढवेल. या कार्यक्रमात प्रसारण, मुद्रित  माध्यमे, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यमे, समाज माध्यम मंच, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) तसेच विस्तारित वास्तव (एक्सआर) या उद्योगांवर आणि क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा

पीआयबी टीम वेव्हजकडून अद्ययावत घोषणा प्राप्त करा

आताच वेव्हजसाठी नोंदणी करा.

***

PIB Mumbai  | N.Chitale/S.Kane/S.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121068) Visitor Counter : 44