सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारताच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे डिजिटल नवोन्मेषांचे अनावरण
Posted On:
07 APR 2025 9:13AM by PIB Mumbai
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MOSPI) नुकत्याच झालेल्या राज्यांच्या मंत्र्यांच्या परिषदेत सुधारित मायक्रोडाटा पोर्टलचे अनावरण केले. माहितीची उपलब्धता, वापरकर्त्यांचा अनुभव यामधील सुधारणा आणि कार्यालयीन सांख्यिकी यंत्रणेतील आधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणातून संकलित केलेले सांख्यिकी तपशील आणि आर्थिक गणना यांच्या प्रचंड तपशीलाचे केंद्रिय भांडार म्हणून काम करणारे हे नवीन पोर्टल, आधीच्या पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी दूर करते. जागतिक बँकेच्या तंत्रज्ञानविषयक पथकाच्या सहकार्याने मंत्रालयाने एक आधुनिक, क्षमता वाढू शकणारे तंत्रज्ञान उपयोगात आणले आहे. हे तंत्रज्ञान अत्याधुनिक सुरक्षा मानकांशी सुसंगत असून प्रतिसादात्मक रचना व माहिती उपलब्धता यंत्रणा यांना देखील सहायक आहे. या पोर्टलचा वापर करण्यासाठी तुम्ही https://microdata.gov.in/ वर क्लिक करू शकता.
यावेळी राष्ट्रीय सांख्यिकी यंत्रणा प्रशिक्षण अकादमीच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. यामुळे मंत्रालयाच्या क्षमता बांधणी उपक्रमासाठी सुलभतेने एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होईल. या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी www.nssta.gov.in वर क्लिक करता येईल. पोर्टल आणि संकेतस्थळ मंत्रालयाच्या डेटा इन्फर्मेटिक्स अँड इनोवेशन विभागाने विकसित केले आहे.
MoSPI ने यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता/मशिन लर्निंग वर आधारित वर्गीकरण उपकरणाची संकल्पना सादर केली. कार्यालयीन तपशील निर्मितीत राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाचा (NIC) वापर सोपा व्हावा या उद्देशाने या उपकरणाची रचना करण्यात आली आहे. हे उपकरण वापरकर्त्यांना त्यांच्या शंका विचारता याव्यात यासाठी नैसर्गिक भाषा प्रक्रियेची सुविधा मिळवून देते त्याचबरोबर सर्वात योग्य पाच NIC कोड्सचा पर्याय देखील सुचवते. या संशोधनामुळे मानवी श्रम कमी झाले. परिणामी अधिक अचूक माहिती संकलन व चांगले नियोजन आणि धोरण आखणे शक्य आहे. मंत्रालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या हॅकेथॉनचे हे फलित आहे.
नाविन्यपूर्ण कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित उपकरणांसह या पोर्टल्सच्या व संकेतस्थळाच्या उद्घाटनातून मंत्रालयाची माहिती व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तांत्रिक सुधारणांचा वापर करुन सांख्यिकी यंत्रणा मजबूत करण्यासाठीची वचनबद्धता अधोरेखित होते. धोरण निर्मितीमध्ये माहिती आधारित दृष्टीकोनाचा अधिक वापर करुन सरकारी हस्तक्षेप अचूक आणि विशिष्ट संदर्भानुसार असल्याची हमी देण्यासाठी व अंतिमतः विकसित भारताचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
***
SonalT/SurekhaJ/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2119690)
Visitor Counter : 19