कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारतातील तरुण नवउद्योजक केवळ यशापाठी  धावत नाहीत तर ते त्यांच्या समुदायाला भेडसावणाऱ्या वास्तव समस्या सोडवत आहेत" – केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

Posted On: 05 APR 2025 6:52PM by PIB Mumbai

 

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत चौधरी स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये फ्युचरप्रेन्युअर्स चॅलेंजच्या ग्रँड फिनालेला उपस्थित राहिले. भारताच्या भरभराटीला येत असलेल्या नवउद्योजकीय परिसंस्थेचा उत्सव साजरा करण्यासाठी फ्युचरप्रेन्युअर्स चॅलेंजचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशातील काही अत्यंत प्रज्ञावंत विद्यार्थी नवोन्मेषकांनी राष्ट्रीय व्यासपीठावर आपले अग्रगण्य उपाय सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या फ्युचरप्रेन्युअर्स चॅलेंजमध्ये 10 उत्कृष्ट विद्यार्थी संघांनी जयंत चौधरी तसेच गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि उद्योगातील नेत्यांसमोर रॅपिड फायर फेरीत आपले अभूतपूर्व नवोन्मेष सादर केले. चौधरी यांनी वैयक्तिकरित्या सर्वोत्कृष्ट 10 स्टार्टअप्सचे अभिनंदन केले आणि त्यांचा सत्कार केला. हे भारताच्या स्टार्टअप्स प्रवासात उदयोन्मुख बदल घडवणारे स्टार्टअप्स असल्याचे त्यांनी सांगितले.

स्टिक बडी या दृष्टिहीनांसाठी तयार केलेल्या स्मार्ट सहाय्यक उपकरणासाठी चंदीगडच्या चितकारा विद्यापीठाला सर्वोच्च पुरस्कार मिळाला. या उपकरणात अडथळ्यांची जाणीव करून देणे, अद्यतनीत वेळ-तारीख सांगणे आणि आपत्कालीन इशारा देणे, अशा सुविंधांचा समावेश आहे.

टीआयई ग्लोबलने आयोजित केलेल्या, जयंत चौधरी यांच्याबरोबर संवाद साधण्याच्या कार्यक्रमात, 'कौशल्यांपासून स्टार्टअप्सपर्यंत: भारतातील तरुण नवउद्योजकांना मुक्त वातावरण प्रदान करणे' या  संकल्पनेवर   आशयघन चर्चा झाली. “आज मला वेगळेपण जाणवले ते म्हणजे  या  फक्त कल्पना नव्हत्या तर निश्चय  होते, असे जयंत चौधरी यांनी उद्योजकांच्या असामान्य मूल्यावर भर देताना सांगितले. येथील प्रत्येक तरुण नवउद्योजक यशाच्या मागे धावत नसून; ते आपल्या समुदायांमधल्या वास्तव  समस्या सोडवत आहेत. जिथे कौशल्ये आणि स्टार्टअप्स एकत्र येतील, अशा मानसिकतेची भारताला आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणे, परिसंस्था मजबूत करणे हे आपले कर्तव्य आहे. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्याला याची खात्री पटेल की त्यांच्या कल्पनेला भारताच्या भविष्यात स्थान आहे, असेही ते म्हणाले. अशाप्रकारे आपण केवळ एक स्टार्टअप राष्ट्रच भारत नाही तर जबाबदार निर्माते आणि नेत्यांचे राष्ट्र निर्माण करत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी मंत्र्यांनी 15 उद्योजकांशी संवादही साधला.

स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये, 3,000 हून अधिक स्टार्टअप्स, 1,000 गुंतवणूकदार आणि 50 हून अधिक जागतिक प्रतिनिधीमंडळांनी सहभाग नोंदवला. यातून जगातील सर्वोत्कृष्ट तीन स्टार्टअप परिसंस्थांमध्ये भारताचे स्थान मजबूत झाले आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119400) Visitor Counter : 26


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil