ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)-III अंतर्गत मणिपूर, मिझोरम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांसाठी पायाभूत सुविधांना चालना देण्याची केली घोषणा

Posted On: 05 APR 2025 11:26AM by PIB Mumbai

 

ग्रामीण संपर्क मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ग्रामीण विकास मंत्रालयाने PMGSY-III अंतर्गत मणिपूर, मिझोरम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांसाठी प्रकल्प मंजूर केले आहेत. या प्रकल्पांची माहिती खालीलप्रमाणे आहे:-

मणिपूर: राज्याला 225.15 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह 280.97 किमी लांबीचे 41 रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. याच उपक्रमाला पुढे नेत, पीएमजीएसवाय-III अंतर्गत राज्यात 404.72 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह 502.24 किमी लांबीचे 56 रस्ते आधीच मंजूर करण्यात आले आहेत.

मिझोरम: राज्याला 67.69 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह 373.46 मीटर लांबीचे 7 लांब पल्ल्याचे पूल (LSB) मंजूर करण्यात आले आहेत. याच उपक्रमाला पुढे नेत, राज्यात PMGSY-III अंतर्गत 562.70 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह 487.50 किमी लांबीचे 17 रस्ते आधीच मंजूर करण्यात आले आहेत.

हिमाचल प्रदेश: राज्याला 140.90 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह 970.772 मीटर लांबीचे 21 लांब पल्ल्याच्या पूल (LSBs) मंजूर करण्यात आले आहेत. या उपक्रमाला पुढे सुरू ठेवत, राज्यात PMGSY-III अंतर्गत 3,123.117 किमी लांबीचे 299 रस्ते आणि 3345.82 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीचे 43 LSBs आधीच मंजूर करण्यात आले आहेत.

उत्तराखंड: राज्याला 40.77 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीचे 246  मीटर लांबीचे 09  लांब पल्ल्याचे पूल (LSBs) मंजूर करण्यात आले आहेत. या उपक्रमाला पुढे सुरू ठेवत, राज्यात PMGSY-III अंतर्गत 2287.95 किमी लांबीचे 212 रस्ते आणि 1865.34 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीचे 09  LSBs आधीच मंजूर करण्यात आले आहेत.

या उपक्रमामुळे:

- आरोग्यसेवा, शिक्षण आणि बाजारपेठा यासारख्या आवश्यक सेवा सहज प्राप्त होतील.

- ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी वाढेल, दुर्गम गावे आणि शहरी केंद्रांमधील दरी कमी होईल.

- या प्रदेशात आर्थिक विकास, व्यापार आणि वाणिज्य वाढेल

- रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना मिळेल.

- सरकारच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहता येईल.

पीएमजीएसवाय-III अंतर्गत प्रकल्पांचा परिवर्तनकारी परिणाम होईल, जो राज्यांच्या विकास आणि समृद्धीला हातभार लावेल आणि समावेशक विकासासाठी सरकारची वचनबद्धता मजबूत करेल.

***

S.Pophale/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119272) Visitor Counter : 14