पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'श्रीलंका मित्र विभूषण' प्रदान

प्रविष्टि तिथि: 05 APR 2025 2:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते 'श्रीलंका मित्र विभूषण' हा सन्मान प्रदान करण्यात आला. आभार मानताना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.

एक्सवरील विविध पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

"आज राष्ट्रपती दिसानायके यांच्याकडून मला 'श्रीलंका मित्र विभूषण' प्रदान करण्यात आला  ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा नाही - तो भारतातील 1.4 अब्ज जनतेला दिलेला आदर आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील लोकांमधील दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे. या सन्मानाबद्दल मी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो."

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2119241) आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada