पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये ऊर्जा क्षेत्रात नवोन्मेष आणण्यासाठी एमओपीएनजीचा सक्रिय सहभाग


स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केले प्रदर्शन

Posted On: 05 APR 2025 9:54AM by PIB Mumbai

 

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) 3 ते 5 एप्रिल दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व निधी उपलब्ध करून देण्यासाठी मजबूत रचना तयार केली आहे. स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये एकूण 32 सार्वजनिक उपक्रम समर्थित स्टार्टअप्स सहभागी झालेत.

ओएनजीसीच्या स्टार्टअप फंडाच्या मूल्यांकनात पाच वर्षांत 450% वाढ झाली आहे, स्टार्टअप इंडिया धोरणाअंतर्गत वेलआरएक्स – हे  त्यांचे पहिले  ऑइलफील्ड स्टार्टअप – 120 हून अधिक देशांमध्ये त्यांच्या ऊर्जा उत्पादनांचा विस्तार करत आहे.

इंडियनऑइलने त्यांच्या IndS_UP उपक्रमांतर्गत 42 स्टार्टअप्सना निधी दिला आहे, ज्यामुळे 86 बौद्धिक संपदा आणि 635 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. ऑइल इंडिया तेल विहिरींसाठी जैवरासायनिक वाळू प्रवाह नियंत्रणात विशेषज्ञ असलेल्या कॅलिचे प्रायव्हेट लिमिटेड तसेच तेल व वायू क्षेत्रासाठी शाश्वत कचरा व्यवस्थापन उपाय विकसित करणाऱ्या कार्बोनेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सारख्या डीपटेक उपक्रमांना देखील पाठिंबा देते.

सार्वजनिक सेवा उपक्रमातिल अधिकाऱ्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाने स्टार्टअप महाकुंभ 2025 मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. यामुळे स्टार्टअपना अनेक दशकांचा औद्योगिक अनुभव व धोरणात्मक अंतर्दृष्टीचा लाभ मिळू शकला. आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू कंपन्यांमधील एकूण 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संशोधन मुद्रीकरण, ईव्ही नवोपक्रम, उत्पादन एकत्रीकरण व गतिशीलता विषयक उपायांवरील त्यांचे कौशल्यज्ञान सामायिक केले.

ओएनजीसीचे अध्यक्ष उद्घाटन सत्रात सहभागी झाले होते. इतर सत्रांमध्ये विद्युतीकरणासाठी गुंतवणूक धोरणे, ईव्ही नवोपक्रमासाठी धोरणात्मक प्रोत्साहने, ईव्ही गतिशीलतेला दूरवर चालना देणे इत्यादींवरील माहिती समाविष्ट होती. या कार्यक्रमात बीपीसीएल, ओएनजीसी, ऑइल इंडिया व एचपीसीएलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह "लॅब टू मार्केट - अनलॉकिंग रिसर्च मॉनेटायझेशन" या शीर्षकाखाली एक इनक्युबेशन गोलमेज आयोजित करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन आवृत्तीच्या भव्य यशानंतर, स्टार्टअप महाकुंभ 2025चा विषय 'स्टार्टअप इंडिया @2047: भारताची कथा उलगडणे' असा आहे. या कार्यक्रमाचा विस्तार लक्षणीयरीत्या झाला आहे, 11 विषयगत क्षेत्रातील 3,000 हून अधिक स्टार्टअप्स 1,0000 हून अधिक गुंतवणूकदार व इनक्यूबेटरसह सहभागी झाले, ज्यामुळे नवोन्मेष व उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.

11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान यशोभूमी, द्वारका, दिल्ली येथे आयोजित इंडिया एनर्जी वीक 2025 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सातत्याने नवोपक्रमांना पाठिंबा आणि मान्यता दिली आहे. 'अविन्य' 25 - एनर्जी स्टार्टअप चॅलेंज' ने CO कॅप्चर (कार्बन डाय ऑक्सइड कमी करणे), ESG सोल्यूशन्स (पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय उपाययोजना) तसेच अक्षय ऊर्जेमध्ये प्रगती करणाऱ्या स्टार्टअप्सना ओळखून त्यांना पुरस्कृत केले. याव्यतिरिक्त, 'वसुधा - ऑइल अँड गॅस स्टार्टअप चॅलेंज' ने अपस्ट्रीम तेल व वायू क्षेत्रात एआय-चालित उपायांचे नेतृत्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले.

इतर सार्वजनिक उपक्रम देखील नवोपक्रमांना चालना देत आहेत. EIL च्या EngSUI उपक्रमाने ₹35 कोटींच्या 31 स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे. त्यांनी औद्योगिक एन्झाईम्स, कंपोस्टेबल पॉलिमर व कार्बन कॅप्चरमधील प्रकल्पांना निधी दिला आहे.

एचपीसीएलच्या एचपी उदगम कार्यक्रमाने 29 स्टार्टअप्सना 35 कोटी रुपयांचा बीज निधी/सीड फंड  उपलब्ध करून दिला आहे, ज्यामध्ये सौरऊर्जेवर चालणारे लांब पल्ल्याचे ड्रोन विकसित करणाऱ्या मराल एरोस्पेसचा समावेश आहे. बीपीसीएलच्या अंकुर कार्यक्रमाने 30 स्टार्टअप्सना 28 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, ज्यामुळे त्यांना 132 दशलक्ष डॉलर्स उभारण्यास व 300 दशलक्ष डॉलर्सचे एकत्रित मूल्यांकन साध्य करण्यास मदत झाली आहे. गेलचा पंख उपक्रम ऊर्जा, लॉजिस्टिक्स व औद्योगिक तंत्रज्ञानातील स्टार्टअप्सना पाठिंबा  देतो, ज्यामध्ये पाइपलाइन दुरुस्ती, बायोगॅस निर्मिती व शाश्वत साहित्यातील उपायांचे प्रदर्शन करणारे उपक्रम आहेत.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे, MoPNG व त्यांचे सार्वजनिक उपक्रम तंत्रज्ञान-चालित व शाश्वत ऊर्जा परिसंस्था निर्माण करत आहेत, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा संक्रमण व नवोन्मेषाच्या परिदृश्याचे नेतृत्व करण्यासाठी स्टार्टअप्सना सक्षम बनवले जात आहे.

***

S.Pophale/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119164) Visitor Counter : 23


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil