लोकसभा सचिवालय
18 व्या लोकसभेच्या चौथ्या अधिवेशनात कामकाजाची उत्पादकता 118 टक्के राहिली : लोकसभा अध्यक्ष
3 एप्रिल 2025 रोजी शून्य प्रहरात सार्वजनिक महत्त्वाच्या 202 बाबींची नोंद: लोकसभा अध्यक्ष
Posted On:
04 APR 2025 6:05PM by PIB Mumbai
31 जानेवारी 2025 रोजी सुरू झालेले अठराव्या लोकसभेचे चौथे अधिवेशन आज संस्थगित झाले. सुमारे 160 तास 48 मिनिटे चाललेल्या या अधिवेशनात 26 बैठका झाल्या, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी सभागृहाला दिली. या अधिवेशनात सभागृहाची उत्पादकता 118 टक्के होती, असेही बिर्ला यांनी सांगितले.
माननीय राष्ट्रपतींनी 31 जानेवारी 2025 रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित केले आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चा 17 तास 23 मिनिटे चालली. चर्चेत 173 सदस्यांनी भाग घेतला, अशी माहिती बिर्ला यांनी दिली.
1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्र्यांनी 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सभागृहात मांडला. 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा 16 तास 13 मिनिटे चालली. या चर्चेत 169 सदस्यांनी भाग घेतल्याची माहिती बिर्ला यांनी दिली. 11 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या चर्चेला अर्थमंत्र्यांनी उत्तर दिले. 21 मार्च 2025 रोजी लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झाले आणि 25 मार्च 2025 रोजी वित्त विधेयक मंजूर झाले.
बिर्ला यांनी सभागृहाला सांगितले की, अधिवेशनादरम्यान 10 सरकारी विधेयके सादर करण्यात आली आणि 16 विधेयके मंजूर करण्यात आली. अधिवेशनादरम्यान 134 तारांकित प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. शून्य प्रहरात सदस्यांनी एकूण 691 सार्वजनिक महत्त्वाचे विषय उपस्थित केले, त्यापैकी 3 एप्रिल 2025 रोजी शून्य प्रहरात सार्वजनिक महत्त्वाचे विक्रमी 202 विषय उपस्थित केले गेले, असे बिर्ला यांनी नमूद केले. अधिवेशनादरम्यान नियम 377 अंतर्गत एकूण 566 विषय उपस्थित करण्यात आले. अधिवेशनादरम्यान, नियम 73अ अंतर्गत 23 निवेदनांसह एकूण 32 निवेदने सादर करण्यात आली असा उल्लेख बिर्ला यांनी केला. विभागीय संबंधित स्थायी समित्यांनी 61 अहवाल सादर केले आणि सभागृहाच्या पटलावर 2518 पेपर्स सादर करण्यात आले, असेही बिर्ला यांनी सांगितले.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119035)
Visitor Counter : 19