सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी प्रणालींच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारांतील मंत्र्यांची 5 एप्रिल , 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार परिषद
Posted On:
04 APR 2025 12:01PM by PIB Mumbai
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) तर्फे “सांख्यिकी प्रणालींच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारांतील मंत्र्यांची परिषद” 5 एप्रिल , 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे.
राष्ट्रीय व राज्यपातळीवरील विविध सामाजिक - आर्थिक निर्देशकांच्या अनुमानांची आवश्यकता आणि त्यासाठी राष्ट्रीय व राज्यपातळीवरील अचूक, व योग्य सांख्यिकी आकडेवारी त्वरित उपलब्ध करून देण्याचे महत्व यात अधोरेखित केले जाणार आहे. ज्या महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्र व राज्य सरकारांमध्ये समन्वयाची व भागीदारीची अतिशय गरज आहे ,इतकेच नव्हे तर राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील प्रणालींच्या बळकटीकरणासाठी जे अतिशय महत्वाचे आहेत ते या परिषदेत चर्चिले जातील. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सांख्यिकी प्रणालीच्या सुधारणांसाठी असलेल्या विशेष गरजा व त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
राज्ये, केंद्रशासित प्रदेश व सांख्यिकी मंत्रालय यांच्यामध्ये विविध महत्वाच्या मुद्द्यांवरील सांख्यिकी बद्दलचे सहकार्य वाढीस लागण्याच्या दृष्टीने एक सशक्त व शाश्वत संरचना उभी करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून या परिषदेचे महत्व आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत सांख्यिकी बळकटीकरणासाठी पाठबळ (SSS) योजना, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणात जिल्हानिहाय अंदाज बांधण्याच्या प्रक्रियेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग, स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GDP), आय आय पी व सी पी आय च्या उप राष्ट्रीय पातळीवरील गणना, अधिकृत आकडेवारी उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेतील अडचणींचा सामना करण्यासाठी सांख्यिकी मंत्रालयाचे नवीन उपक्रम, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना विकासात मंत्रालयाची तंत्रज्ञानविषयक मदत , प्रशासनविषयक सांख्यिकी व पर्यायी आकडेवारी संचांचा अधिक वापर, शाश्वत विकास उद्दिष्टपूर्तीसाठी उप राष्ट्रीय पातळीवरील संरचना सुधार व MPLAD योजनेची अंमलबजावणी, इत्यादींचा यात समावेश आहे.
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार) राव इंदरजित सिंग, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यसरकारातील योजना मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सांख्यिकी मंत्रालयाचे अधिकारी व इतर महत्वाचे अधिकारी या परिषदेला हजर राहणार आहेत.
***
JPS/U.Raikar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118732)
Visitor Counter : 20