कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स - e-SCR 18 प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयांसोबत सहकार्यपूर्ण भागीदारी

Posted On: 03 APR 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2025

 

ई-सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स (e-SCR) अर्थात सर्वोच्च न्यायालयाच्या ई अहवाल निकालांचा  18 प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांसोबत सहकार्यपूर्ण भागिदारी केली आहे. यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित कायदेशीर भाषांतर सल्लागार समिती स्थापन केली आहे. ही समिती कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित साधनांचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या (e-SCR) स्थानिक भाषांमधील भाषांतरावर देखरेख ठेवेल.  प्रत्येक उच्च न्यायालयातही त्या-त्या  उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वात अशीच समिती स्थापन करण्यात आली आहे.  

सर्वोच्च न्यायालयाची कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सहाय्यित समिती उच्च न्यायालयांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित समित्यांसोबत सातत्याने बैठकाही घेत आहे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या निर्णयांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी दिशानिर्देश/सूचना देत आहे. उच्च न्यायालयांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-सहाय्यित समिती, कायदा सचिव, महाधिवक्ता आणि राज्यातील भाषांतर विभागाच्या प्रभारी सचिवांना सर्वोच्च न्यायालयाच्या e-SCRचे तसेच उच्च न्यायालयांच्या निर्णयांचे त्या राज्याच्या स्थानिक/प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्यासाठी प्रत्येक उच्च न्यायालयात भाषांतरकार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.  

28.03.2025 पर्यंत, उच्च न्यायालयांच्या सहाय्याने 36344 सर्वोच्च न्यायालयीन निर्णय हिंदी भाषेत आणि 47439 निर्णय इतर स्थानिक भाषांमध्ये भाषांतरित करून e-SCR पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत (परिशिष्ट-1).  

Annexure-I

Details of Supreme Court Judgments translated in Hindi language and in other vernacular languages and uploaded on e-SCR portal as on 28.03.2025.

Supreme Court Vernacular Judgements Available on e-SCR Portal

Sl. No.

Local Language

No. of Judgements

  1.  

Assamese

340

  1.  

Bengali

3600

  1.  

Garo

7

  1.  

Gujarati

3361

  1.  

Hindi

36344

  1.  

Kannada

1942

  1.  

Kashmiri

1

  1.  

Khasi

4

  1.  

Konkani

16

  1.  

Malayalam

2996

  1.  

Marathi

2628

  1.  

Nepali

153

  1.  

Odia

378

  1.  

Punjabi

25004

  1.  

Santali

51

  1.  

Tamil

2808

  1.  

Telugu

1659

  1.  

Urdu

2491

Total

83783

ही माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज  मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज राज्यसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2118356) Visitor Counter : 26


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi