संरक्षण मंत्रालय
पाचव्या 25 टन बोलार्ड पुल टग ओजसचे (यार्ड 339) उद्घाटन
Posted On:
02 APR 2025 4:39PM by PIB Mumbai
31 मार्च 2025 रोजी कोलकाता येथील मेसर्स टीआरएसएल येथे पाचव्या 25 टन बोलार्ड पुल (बीपी) टग ओजसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोलकाता येथील एसएसबीचे अध्यक्ष कमांडर संजय कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा पाचवा टग 12 नोव्हेंबर 2021 रोजी मेसर्स टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड (टीआरएसएल), कोलकाता यांच्याशी झालेल्या सहा (06) 25 टन बीपी टगच्या बांधकाम कराराचा एक भाग आहे. हे टग भारतीय नौदल नोंदणी (आयआरएस) च्या संबंधित नौदल नियम आणि नियमनानुसार स्वदेशी पद्धतीने आरेखन करून बांधले गेले आहेत.
शिपयार्डने यापैकी चार टग यशस्वीरित्या उपलब्ध करून दिले आहेत. भारतीय नौदलाद्वारे यांचा वापर मर्यादित पाण्यातील बर्थिंग, अन-बर्थिंग किंवा नौकानयन कौशल्यासाठी नौदलाच्या जहाजांना तसेच पाणबुड्यांना मदत करण्यासाठी केला जातो. हे टग जहाजांच्या शेजारी किंवा नांगरावर तरंगत अग्निशमन मदत देखील उपलब्ध करू शकतात आणि मर्यादित शोध आणि बचाव कार्य करण्याची क्षमता देखील त्यांच्याकडे आहे.
हे टग भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे अभिमानी ध्वजवाहक आहेत.
(6)RDMY.jpeg)
(9)AH8T.jpeg)
(8)BCWY.jpeg)
***
JPS/ NMathure/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118135)
Visitor Counter : 22