अर्थ मंत्रालय
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) 1 मे 2025 पासून विशिष्ट विमानतळांवर विमान प्रवाशांद्वारे वैयक्तिक वाहतुकीच्या माध्यमातून आयात/निर्यातीसाठी इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया सुरू करणार
Posted On:
01 APR 2025 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येणारे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) विशिष्ट विमानतळांवर विमान प्रवाशांकडून वैयक्तिक वाहतुकीद्वारे रत्ने आणि दागिने/नमुने/प्रोटोटाइपशी संबंधित बिल ऑफ एंट्री/शिपिंग बिलाची इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया 01.05.2025 पासून सुरू करणार आहे.
परराष्ट्र व्यापार धोरण (एफटीपी) 2023 आणि हँडबुक ऑफ प्रोसिजर (एचबीपी), 2023 च्या तरतुदींनुसार वैयक्तिक वाहतूकीद्वारे निर्यात/आयात होईल.
एचबीपीच्या परिच्छेद 4.87 मध्ये निर्दिष्ट केलेल्या नऊ विमानतळांवर (दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, कोची, कोइम्बतूर, बंगळुरू, हैदराबाद आणि जयपूर) रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीसाठी आणि एचबीपीच्या परिच्छेद 4.88 निर्दिष्ट केलेल्या सात विमानतळांवर (दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि जयपूर) रत्ने आणि दागिन्यांच्या आयातीसाठी वैयक्तिक कॅरेजची सुविधा उपलब्ध असेल. यंत्रसामग्रीचे नमुने/प्रोटोटाइपच्या बाबतीत ही सुविधा सुरुवातीला बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर उपलब्ध आहे.
विशेषतः रत्ने, दागिने आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या व्यवहारात अशा पद्धतीच्या ताळमेळ असलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीमुळे व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल.
* * *
S.Kane/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117568)
Visitor Counter : 30