सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन‌ सहकार धोरण

प्रविष्टि तिथि: 01 APR 2025 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2025

 

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या "सहकार से समृद्धी" या कार्याची पूर्तता करण्यासाठी नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यात‌ येत आहे. सहकार क्षेत्राच्या खऱ्याखुऱ्या क्षमतेला उजाळा देण्याच्या दृष्टीने एक चौकट तयार करण्यासाठी नवीन सहकार धोरण तयार करण्यासाठी 2.9.2022 रोजी सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या नेतृत्वाखाली सहकारी क्षेत्रातील तज्ञ, राष्ट्रीय/राज्य/जिल्हा/प्राथमिक स्तरावरील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे सचिव (सहकार) आणि निबंधक सहकारी संस्था आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांचे अधिकारी यांचा समावेश असलेली राष्ट्रीय पातळीवरील समिती स्थापन करण्यात आली.

समितीने भागधारकांकडून सूचना मिळविण्यासाठी देशभरात 17 बैठका घेतल्या आणि चार प्रादेशिक कार्यशाळा घेतल्या. प्राप्त झालेल्या सूचनांचा मसुदा धोरणात योग्यरित्या समावेश करण्यात आला आहे. मसुदा धोरण तयार करण्यात आले आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kane/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2117244) आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil