नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आयआरईडीएच्या कर्ज मंजुरीत 27% वाढ होऊन ती 47,453 कोटी रुपये झाली, कर्ज वही खाते 28% वाढून 76,250 कोटी रुपये झाले

Posted On: 31 MAR 2025 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मार्च 2025

 

भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था लिमिटेड (आयआरईडीए) ने आज 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी आपल्या आर्थिक कामगिरीत लक्षणीय वाढ नोंदवल्याचे तात्पुरत्या आकडेवारीच्या आधारावर म्हटले आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर्ज मंजुरी 47,453 कोटी रुपये झाली, जी मागील वर्षातील 37,354 कोटी रुपयांहून 27% अधिक आहे. कर्ज वितरण 20% वाढून 30,168 कोटी झाले, जे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 25,089 कोटी रुपये होते. 31 मार्च 2025 पर्यंत थकीत कर्जाच्या रकमेत 28% वाढ होऊन ती 76,250 कोटी रुपयांवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या 59,698 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

“आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आयआरईडीएची वार्षिक कामगिरी जाहीर केल्याने, कॉर्पोरेट प्रशासनाच्या सर्वोच्च मानकांप्रति आणि आमच्या गुंतवणूकदारांसोबतच्या पारदर्शकतेप्रति आमची दृढ वचनबद्धता अधोरेखित होते”, असे आयआरईडीएचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास म्हणाले. कर्ज मंजुरी, वितरण आणि कर्जाच्या वही खात्यात आयआरईडीएची सातत्यपूर्ण वाढ नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी आमची दृढ प्रतिबद्धता दर्शवते, असेही ते म्हणाले. आम्ही नवोन्मेषी आणि सुलभ वित्तपुरवठा उपायांद्वारे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला सहयोग करण्यासाठी वचनबद्ध आहोत, यांचा पुनरुच्चार त्यांनी केला. 

"माननीय केंद्रीय मंत्री; माननीय केंद्रीय राज्यमंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव; आमचे संचालक मंडळ; नियामक; तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि इतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे त्यांच्या निरंतर सहयोगाबद्दल मी मनापासून आभार मानतो. ज्यांच्या वचनबद्धतेने आमचे यश निश्चित झाले त्या टीम आयआरईडीएच्या समर्पण आणि अथक प्रयत्नांचेही मी कौतुक करतो," असे दास म्हणाले.

हे तात्पुरते आकडे लेखापरीक्षणाच्या अधीन आहेत. 

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117079)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil