पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची श्री श्री हरिचंद ठाकूर यांना जयंतीदिनी आदरांजली
Posted On:
27 MAR 2025 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री श्री हरिचंद ठाकूर यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे. ठाकूर यांनी उपेक्षितांच्या कल्याणासाठी व समता, बंधुता आणि न्याय यांच्या प्रसारासाठी केलेल्या कामाची प्रशंसा करुन मोदी यांनी 2025 च्या मातुआ धर्म महामेळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स माध्यमावरील संदेशात त्यांनी लिहिले आहे,
“श्री श्री हरिचंद ठाकूर यांना जयंतीदिनानिमित्त आदरांजली. असंख्य लोकांच्या हृदयात त्यांना स्थान मिळाले आहे. सेवा व अध्यात्म यासाठी त्यांनी केलेल्या कामासाठी धन्यवाद. त्यांनी आपले आयुष्य उपेक्षितांच्या कल्याणासाठी आणि समता, बंधुता व न्याय यांच्या प्रसारासाठी वेचले. पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर आणि बांग्लादेशमधील ओराकंदी या ठिकाणांना दिलेली भेट माझ्या कायम स्मरणात राहील. तिथे मी त्यांना आदरांजली अर्पण केली होती.
मातुआ समुदायाच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या 2025 मधील मतुआ धर्म महामेळ्याला #MatuaDharmaMahaMela2025 माझ्या शुभेच्छा. आमच्या सरकारने मतुआ समाजाच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत आणि आगामी काळातही आम्ही त्यांच्या कल्याणासाठी अथकपणे काम करत राहू. जय हरि बोल!
@aimms_org”
* * *
S.Patil/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115916)
Visitor Counter : 33
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam