संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी 50 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्ट-अप्स यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे विचारमंथन

Posted On: 26 MAR 2025 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2025

 

संरक्षण उत्पादन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, सचिव (DP) संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, 50 हून अधिक स्टार्ट-अप आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांतील धुरीणांनी एकत्र येऊन अशा  उपक्रमांसमोर  येणारी प्रमुख आव्हाने समजून घेणे, संधी ओळखणे आणि नाविन्यपूर्णतेला गती देण्यासाठी त्यांचे समर्थन करणे या विषयांवर चर्चा केली. ही विचारमंथन सत्रे दिनांक 24 आणि 25 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे आयोजित करण्यात आली होती.

सत्रांना उपस्थित असलेले, बहुतेक स्टार्ट-अप आणि एमएसएमई, संरक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उत्कृष्टता (इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स, iDEX) यासाठी काम करत आहेत. अंतराळ तंत्रज्ञान, क्वांटम टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे लढल्या जाणाऱ्या लढाया, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि मशीन लर्निंग, रडार तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि प्रगत सामग्री यासारख्या सखोल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान अशा विषयांवर झालेल्या सर्वांगीण विचार-विनिमयामुळे त्यांना नागरी संरक्षण आणि संभाव्य संरक्षण क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांसाठी असलेल्या त्यांच्या कार्यपध्दती समजून घेण्यास मदत झाली.

सहभागींनी  केलेल्या मौलिक सूचनांबद्दल त्यांचे आभार मानताना सचिव (संरक्षण उत्पादन) म्हणाले, की अशा सत्रांमुळे मंत्रालयाला उद्योग, विशेषत: नवीन तंत्रज्ञान स्टार्ट-अपचा दृष्टीकोन समजून घेण्यात मदत होईल.तसेच यामुळे धोरणे आणि कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करण्यास मदत होऊन  तंत्रज्ञानामध्ये सखोलपणे काम करणाऱ्या स्टार्ट-अप्सचा  सहभाग विस्तारेल, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115569) Visitor Counter : 22


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil