संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चौथ्या 25 टन बोलार्ड पुल (BP) टग युवन (Tug Yuvan) या बोटीचा नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक समावेश

प्रविष्टि तिथि: 26 MAR 2025 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2025

 

चौथ्या 25 टन बोलार्ड पुल (BP) टग युवन (Tug Yuvan) या बोटीचा आज समारंभपूर्वक नौदलाच्या ताफ्यात समावेश केला गेला. आज दि. 26 मार्च 2025 रोजी विशाखापट्टणम इथल्या नौदल गौदीत हा समारंभ पार पडला. या समारंभाला कमोडोर राजीव जॉन आणि महाव्यवस्थापक (रिफिट) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ही टग बोटीची बांधणी कोलकात्यातील मेसर्स टिटागढ रेल सिस्टिम्स लिमिटेड (TRSL) यांच्यासोबत केल्या गेलेल्या सहा (06) 25 टन बलार्ड पुल टगच्या बांधणी कराराअंतर्गत केली गेली आहे. 12 नोव्हेंबर 2021 रोजी हा करार झालेला आहे. या टग बोटींचे संरचनात्मक आरेखन अर्थात डिझाईन ही पूर्णतः स्वदेशी असून, या बोटीची बांधणी भारतीय नौवहन नोंदणी (IRS) अंतर्गतच्या नियम आणि विनियमांनुसारच केली गेली आहे. या जहाज बांधणी आणि देखभाल कारखान्याने (शिपयार्ड) त्यांच्यासोबत केलेल्या करारापैकी आत्तापर्यंत 3 टग बोटी यशस्वीरीत्या भारतीय नौदलाला सुपूर्द केल्या आहेत. नौदलची जहाजे आणि पाणबुड्यांचे नागर रोवणे, नौदल तळावरून नांगर काढून रवाना होणे, मुक्तता तसेच मर्यादित जलक्षेत्रात दिशा बदलण्यातले सहाय्यक म्हणून नौदलाच्या वतीने या टग बोटींचा वापर केला जात आहे. या टग बोटी  जहाजांना तटावर असताना किंवा नांगर रोवलेल्या स्थितीत असताना अग्निशमन साहाय्य पुरवण्यासाठी तसेच मर्यादित स्वरुपात शोध आणि बचाव कार्यासाठीही उपयुक्त ठरत आहेत.

या टग बोटी भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांचे गौरवशाली प्रतीक आहेत.

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2115555) आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali