माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वॅम ! (वेव्हज अॅनिमे आणि मंगा स्पर्धा) नागपूर 2025 मध्ये जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात भारतातील उदयोन्मुख अॅनिमे, मंगा आणि वेबटून प्रतिभेचे प्रदर्शन
Posted On:
26 MAR 2025 8:15PM by PIB Mumbai
नागपूर, 26 मार्च 2025
भारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने नागपूर येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या सहकार्याने (वेव्हज अॅनिमे आणि मंगा स्पर्धा)चे यशस्वीरित्या आयोजन केले. हा कार्यक्रम म्हणजे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) मधील क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग असून या माध्यमातून मध्य भारतातील काही सर्वात आश्वासक कलाकार, अॅनिमेटर, व्हॉइस कलाकार आणि कॉस्प्लेअर्स एकत्र आले. वेव्हज शिखर परिषद मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

वॅम नागपूरने अॅनिमे, मंगा आणि वेबटूनमधील देशांतर्गत उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन आणि चालना देण्याचे आपले ध्येय सुरू ठेवले असून या उपक्रमाला आणखी पुढे नेले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध श्रेणींमधील उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. यामध्ये मंगा (जपानी-शैलीतील कॉमिक्स), वेबटून (डिजिटल कॉमिक्स), अॅनिमे (जपानी-शैलीतील अॅनिमेशन, आवाज अभिनय स्पर्धा आणि कॉस्प्ले स्पर्धा यांचा समावेश होता.
XK17.jpeg)
नागपूर मध्ये झालेल्या वॅम कार्यक्रमाचे परीक्षण उद्योग जगतातील प्रतिथयश मान्यवरांच्या पॅनेलद्वारे करण्यात आले यामध्ये भसीन समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेचे अध्यक्ष सुशील भसीन, कायरा अॅनिमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि एमपी एव्हीजीसी-एक्सआर मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशनचे सह-अध्यक्ष अर्पित दुबे आणि नीलेश पटेल, अॅनिमेशन स्टुडिओचे सीईओ आणि एमपी एव्हीजीसी-एक्सआर मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशनचे व्हर्टिकल डायरेक्टर नीलेश पटेल यांचा समावेश होता.
वॅम कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण समारंभात नागपूरच्या जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक, डॉ. विवेक कपूर, जीएचआरसीईएमचे (विज्ञान आणि तंत्रज्ञान) अधिष्ठाता प्राध्यापक अनुपम चौबे, जीएचआरसीईएमच्या एम सी ए विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या डहाके आणि वॅम जीएचआरसीईएमचे समन्वयक प्राध्यापक नीरज कुमार झा यांचा समावेश होता. या संपूर्ण कार्यक्रमासाठी समन्वय आणि सुविधा प्रदान करण्यात नागपूरच्या जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वॅम! नागपूर 2025 चे निकाल
कॉस्प्ले
विजेते: महेश शौकत सय्यद
प्रथम उपविजेते: शंतनू देशपांडे
दुसरे उपविजेते: वंश नाईक
मंगा स्पर्धा
विजेते - अनिशा बांगरे (विद्यार्थी)
वेबटून
विजेते: अंजली वर्मा (व्यावसायिक).
अॅनिमे
विजेते: शुभांशु सिंग, शेफाली सिंग, निहाल डुंगडुंग, प्रथम विराणी
सर्व विजेत्यांना पेन टॅब्लेट्स आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त अॅनिमे विजेत्यांच्या पायलट एपिसोडना इंग्रजी, हिंदी आणि जपानी भाषेत डब करण्याचे आश्वासन दिले असून त्यामुळे ते जगभरात पोहोचतील. तसेच टून्सुत्राने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वेबटून विजेत्यांच्या कामाचे वितरण करण्याची घोषणा केली आहे. तर काही संस्थांनी देखील वॅम विजेत्यांसाठी त्यांच्या संस्थेत नोकरीची संधी देऊ केली असून अॅनिमेशन उद्योगात करिअर करु इच्छिणाऱ्या या नवोदित कलाकारांना इंटर्नशिपची हमी दिली आहे.
याआधी मुंबई, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी आणि दिल्ली येथे वॅम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
वेव्हज बद्दल
भारत सरकार 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीचा एक ऐतिहासिक उपक्रम ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेंमेंट समिट’ (वेव्हज- अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद) आयोजित करणार आहे. तुम्ही उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माते किंवा नवोन्मेषक असलात तर, WAVES - एक जागतिक व्यासपीठ म्हणून - जागतिक माध्यम आणि मनोरंजन जगताशी जोडले जाण्यासाठी, सहयोग, नवोन्मेष तसेच योगदान देण्यासाठी महत्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करते.
भारताला जागतिक सर्जनशीलता केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दृष्टिकोनासह, वेव्हजचे उद्दिष्ट सर्जनशीलता, नवोन्मेष आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्यासाठी नवीन मानके स्थापित करणे आहे. या शिखर परिषदेत भारताची सर्जनशील शक्ती वाढेल, आशय निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून त्याचे स्थान बळकट होईल. प्रसारण, मुद्रित माध्यमे, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (एआर), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर) यासारख्या उद्योग आणि क्षेत्रांवर वेव्हजमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
या, आमच्यासोबत सामील व्हा ! वेव्हज साठी आत्ताच नोंदणी करा (लवकरच आपल्या भेटीला येत आहे!)
पीआयबीच्या टीम वेव्हज कडून येणाऱ्या नवीनतम घोषणांसह अपडेट राहा.
* * *
PIB Mumbai | S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115525)
Visitor Counter : 69