सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना

Posted On: 26 MAR 2025 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2025

 

केंद्र सरकारने 31.05.2023 रोजी "सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजने" ला मान्यता दिली, जी पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवली जाईल. या योजनेत प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस) स्तरावर विविध कृषी पायाभूत सुविधा निर्माण करणे समाविष्ट आहे, ज्यामध्ये गोदामे, कस्टम हायरिंग सेंटर, प्रक्रिया युनिट, इत्यादींचा समावेश आहे. भारत सरकारच्या (जी ओ आय) विविध विद्यमान योजना, जसे की, कृषी पायाभूत सुविधा निधी (एक आय एफ), कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना (ए एम आय), कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (एस एम ए एम), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजना (पी एम एफ एम ई) औपचारिकीकरण इत्यादींचा समावेश आहे.

 

S.No.

State

District

Name of PACS

Capacity of Godown (MT)

1.

Maharashtra

Amravati

Neripanglai    Vividh    Karyakari

Sahakari Sanstha

3,000

 

2.

 

Uttar Pradesh

 

Mirzapur

Bahudeshiya Prathamik Grameen Sahakari Samiti Limited, Kotwa Panday

 

1,500

 

3.

Madhya Pradesh

 

Balaghat

Bahudeshiya  Prathamik  Krishi

Saakh Sahakari Society Maryadit Parswada

 

500

4.

Gujarat

Ahmedabad

The Chandranagar Group Seva

Sahakari Mandli Limited

750

5.

Tamil Nadu

Theni

Silamarathupatti               Primary Agriculture Credit Society

1,000

6.

Rajasthan

Sri

Ganganagar

Ghumudwali        Gram        Seva

Sahakari Samiti Limited

250

7.

Telangana

Karimnagar

Primary       Agriculture      Credit

Society Limited, Gambhiropet

500

8.

Karnataka

Bidar

Primary Agriculture Cooperative Federation Limited, Ekamba

1,000

9.

Tripura

Gomati

Khilpara     Primary     Agriculture

Credit Society Limited

250

10.

Assam

Kamrup

2  No.  Pub  Bongshar  G.P.S.S

Limited

500

 

11.

 

Uttarakhand

 

Dehradun

Bahudeshiya        Kisan        Seva

Sahakari        Samiti        Limited, Sahaspur

 

500

 

Total

 

 

9,750

 

याव्यतिरिक्त, पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत 500 अतिरिक्त पीएसीएस मध्ये पायाभरणी करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 575 पीएसीएस निवडण्यात आले आहेत, ज्यांची राज्यवार माहिती परिशिष्टात दिली आहे.

मंत्रालयातर्फे देशभरातील सर्व पंचायती/गावांना समाविष्ट करण्यासाठी 2 लाख बहुउद्देशीय पीएसीएस, तसेच दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन आणि मजबूत करण्याची योजना राबवली जात आहे, ज्यासाठी मार्गदर्शिका (मानक कार्यप्रणाली) देखील सुरू करण्यात आली आहे. मार्गदर्शिकेनुसार, 2028-29 या आर्थिक वर्षापर्यंत 218 पीएसीएस स्थापन करण्याचे उद्दिष्ट असताना कर्नाटक राज्यात 128 पीएसीएस आधीच स्थापन करण्यात आल्या आहेत. शिवाय जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत, कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात एकंबा येथील प्राथमिक कृषी सहकारी महासंघ लिमिटेड येथे 1,000 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम देखील बांधण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाचा परिणाम म्हणून पीएसीएस स्तरावर एकूण 9,750 मेट्रिक टन विकेंद्रित साठवणूक क्षमता निर्माण करण्यात आली आहे. पीएसीएस स्तरावर गोदामांच्या निर्मितीचा उद्देश पुरेशी विकेंद्रित साठवणूक क्षमता निर्माण करून अन्नधान्याचा अपव्यय कमी करणे, देशाची अन्न सुरक्षा मजबूत करणे, पिकांची त्रासदायक विक्री रोखणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळण्यास सक्षम करणे हा आहे. पीएसीएस ही खरेदी केंद्र तसेच रास्त किंमत दुकाने (एफपीएस) म्हणून देखील काम करू शकत असल्याने, खरेदी केंद्रांपर्यंत धान्य वाहतूक आणि गोदामांमधून एफपीएसमध्ये साठा परत नेण्यासाठी होणारा खर्च देखील वाचू शकतो.

सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

State wise details of identified PACS/ LAMPS

Sr.No

Name of the State

Identified PACS / LAMPS

1

Maharashtra

258

2

Gujarat

47

3

Tripura

8

4

Haryana

11

5

Odisha

78

6

Uttar Pradesh

24

7

Jammu & Kashmir

11

8

Rajasthan

100

9

Madhya Pradesh

38

 

Sub Total

575

 

 

* * *

S.Patil/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115267)