सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत बीज ब्रँड

Posted On: 25 MAR 2025 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मार्च 2025

केंद्रीय सहकार मंत्रालयाने बहु-राज्य सहकारी संस्था (MSCS) अधिनियम, 2002 अंतर्गत भारतीय बीज सहकारी संस्था लिमिटेड (BBSSL) ची स्थापना केली आहे. पीक उत्पादन सुधारण्यासाठी बीज सहकारी संस्था लिमिटेड, सहकारी संस्थांच्या सहकार्याने भारत बीज या एकाच ब्रँड अंतर्गत दर्जेदार बियाण्यांचे उत्पादन, खरेदी आणि वितरण करेल.

आतापर्यंत 19,674 सहकारी संस्था भारतीय बीज सहकारी संस्था लिमिटेडच्या सदस्य झाल्या असून त्यापैकी 334 सदस्य संस्था झारखंडच्या आहेत. भारतीय बीज सहकारी संस्था लिमिटेडने झारखंड सरकारकडून बियाण्यांसाठी परवाना प्राप्त केला आहे. या संस्थेच्या कार्यक्षम दळणवळण व्यवस्थेमुळे झारखंड मधील दुर्गम आणि दूरवरच्या ठिकाणांना देखील उच्च दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित होऊ शकेल.

शेतकऱ्यांमध्ये दर्जेदार बियाण्यांच्या वापराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी  राज्य कृषी विभागांच्या कृषी विस्तार सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत प्रशिक्षण सत्रे, कार्यशाळा , फ्रंट-लाइन प्रात्यक्षिक (FLD), समूह फ्रंट लाइन प्रात्यक्षिक (CFLD) , इतर प्रात्यक्षिक कार्यक्रम, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी फील्ड स्कूल इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातान. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांमध्ये भारत बीज ब्रॅण्डच्या दर्जेदार बियाण्यांच्या वापरासाठी आणि लहान आणि सीमांत शेतकऱ्यांमध्ये खालील पद्धतींनी ते स्वीकारण्याबद्दल जागरूकता वाढवण्याचा निर्णय भारतीय बीज सहकारी संस्था लिमिटेडने घेतला आहे:

  • समाज माध्यम आणि बीबीएसएल वेबसाइटद्वारे जागरूकता मोहीम.
  • विविध स्तरांवर शेतकरी मेळाव्यांचे आयोजन.
  • प्रादेशिक कार्यशाळा, चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित करणे.
  • राष्ट्रीय,राज्य आणि प्रादेशिक पातळीवर प्रात्यक्षिके दाखवणे आणि प्रचारात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे.

बाजारात विकल्या जाणाऱ्या बियाण्यांच्या गुणवत्तेचे नियमन करण्यासाठी बियाणे कायदा, 1966, बियाणे नियम, 1968 आणि बियाणे (नियंत्रण) आदेश, 1983 आणि त्यामधील सुधारणांअंतर्गत पुरेशा तरतुदी उपलब्ध आहेत.  या सर्व कायद्यांमुळे राज्य सरकारांना बियाण्यांची गुणवत्ता आणि निकृष्ट दर्जाच्या किंवा बनावट बियाण्यांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.       

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत राज्य सरकार आणि खाजगी बियाणे कंपन्यांना शेतकऱ्यांना वितरण करण्यासाठीच्या विविध पिकांच्या ब्रीडर बियाण्यांचे वाटप,  पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी एक वर्ष आगाऊ मिळालेल्या ब्रीडर इंडेंटच्या बदल्यात केले जाते.

भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 19 एप्रिल 2023 रोजी न्यूक्लियस-ब्रीडर-फाउंडेशन-प्रमाणित बियाण्यांमधील बियाणे साखळीचे प्रभावी निरीक्षण, कार्यक्षमता आणि पारदर्शकता यासाठी  बियाणांची ओळख, प्रमाणीकरण आणि समग्र यादी (साथी ) पोर्टल च्या माध्यमातून उत्तम बियाण्यांची पारख करण्यास सुरुवात केली आहे. बियाणे विक्रेते आणि वितरकांसह खाजगी संस्था देखील यात सहभागी आहेत आणि याद्वारे संपूर्ण पुरवठा साखळीत साथी पोर्टलद्वारे पाठपुरावा करण्याची योजना आखण्यात आली आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2115108) Visitor Counter : 32


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu