केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला
Posted On:
25 MAR 2025 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
सप्टेंबर 2024 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2024 च्या निकालांच्या आधारे आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या एस एस बी मुलाखतींच्या आधारे इंडियन मिलिटरी अकादमी,डेहराडूनच्या 159 व्या (डी ई) अभ्यासक्रमासाठी; इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला, केरळ आणि एअर फोर्स अकादमी, हैदराबाद (प्री-फ्लाइंग) चा प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजेच क्रमांक 218 एफ(पी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या 349 (223 + 89+ 37) उमेदवारांच्या याद्या खालीलप्रमाणे आहेत.
2. विविध अभ्यासक्रमांसाठी तीनही यादींमध्ये काही सामायिक उमेदवार आहेत.
3. सरकारने सूचित केलेल्या रिक्त पदांची संख्या भारतीय लष्करी अकादमीसाठी 100 आहे [एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्रे (आर्मी विंग) धारकांसाठी राखीव असलेल्या 13 रिक्त पदांसह], भारतीय नौदल अकादमी, एझिमाला, केरळ कार्यकारी शाखा (सामान्य सेवा)/हायड्रोसाठी 32 [एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र (नौदल विंग) धारकांसाठी 06 रिक्त पदांसह] आणि हवाई दल अकादमी, हैदराबादसाठी 32 [एनसीपी स्पेशल प्रवेशाद्वारे एन सी सी ‘सी’ प्रमाणपत्र (एअर विंग) धारकांसाठी 03 रिक्त पदे राखीव आहेत].
4. आयोगाने भारतीय लष्करी अकादमी, भारतीय नौदल अकादमी आणि हवाई दल अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी लेखी परीक्षेत अनुक्रमे 2534, 900 आणि 613 पात्र उमेदवारांची शिफारस केली होती. लष्करी मुख्यालयाने घेतलेल्या एसएसबी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या अंतिम आहे.
5. या याद्या तयार करताना वैद्यकीय तपासणीचे निकाल विचारात घेतले गेले नाहीत.
6. या उमेदवारांच्या जन्मतारखा आणि शैक्षणिक पात्रतेची पडताळणी अद्याप लष्करी मुख्यालयाकडून सुरू आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांची उमेदवारी या स्कोअरवर तात्पुरती आहे. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी दावा केलेल्या जन्मतारखा/शैक्षणिक पात्रता इत्यादींच्या समर्थनार्थ मूळ प्रमाणपत्रे, त्यांच्या छायांकित साक्षांकित प्रतींसह स्वतःच्या पहिल्या पसंतीनुसार लष्कर मुख्यालय/नौदल मुख्यालय/हवाई मुख्यालयात पाठवाव्यात.
7. जर पत्त्यामध्ये काही बदल झाला असेल तर उमेदवारांनी त्वरित लष्कर मुख्यालय/नौदल मुख्यालय/हवाई मुख्यालयाला थेट कळवावे.
8. हे निकाल यूपीएससीच्या http://www.upsc.gov.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. तथापि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए) कोर्स फॉर कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (II), 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे गुण वेबसाइटवर उपलब्ध असतील.
9. अधिक माहितीसाठी, उमेदवार कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 दरम्यान आयोगाच्या कार्यालयातील गेट ‘सी’ जवळील सुविधा काउंटरवर प्रत्यक्ष भेटून किंवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
S.Patil/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115105)
Visitor Counter : 17