आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान आरोग्य मंदिरांबाबत अद्यतनीत माहिती
फेब्रुवारी 2025 पर्यंत देशभरात 1,76,573 आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित
आयुष्मान आरोग्य मंदिरात उच्च रक्तदाबासाठी 107.10 कोटी तर मधुमेहासाठी 94.56 कोटी जणांची झाली तपासणी
आयुष्मान आरोग्य मंदिरात योगासह एकूण 5.06 कोटी वेलनेस सत्रांचे आयोजन
Posted On:
25 MAR 2025 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
आयुष्मान आरोग्य मंदिर (एएएम) पोर्टलवर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 पर्यंत देशभरात एकूण 1,76,573 आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पोर्टलनुसार, आयुष्मान आरोग्य मंदिरात उच्च रक्तदाबासाठी 107.10 कोटी आणि मधुमेहासाठी 94.56 कोटी जणांची तपासणी करण्यात आली आहे.
आयुष्मान आरोग्य मंदिरात योग,सायकलिंग आणि ध्यान यासारख्या आरोग्याशी संबंधित क्रियांची सत्रे आयोजित केली जातात.आयुष्मान आरोग्य मंदिरात 28.02.2025 पर्यंत योगासह एकूण 5.06 कोटी वेलनेस सत्रे आयोजित करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114880)
Visitor Counter : 26