पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
उर्जा सुरक्षेच्या सुनिश्चितीसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना
Posted On:
24 MAR 2025 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
पेट्रोल आणि डिझेलचे दर हे बाजार-निर्धारित असतात तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्याद्वारेच (Public Sector Oil Marketing Companies - OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबतचा योग्य निर्णय घेतला जातो.
सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या विविध उपायांमुळे देशांतर्गत, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 94.77 रुपये आणि 87.67 रुपये प्रति लिटरपर्यंत (दिल्लीतील दर) खाली आल्या आहेत. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 अशा दोन टप्प्यात पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क अनुक्रमे 13 रुपये/लिटर आणि 16 रुपये/लिटरने कमी केले आहे, आणि याचा संपूर्ण लाभ ग्राहकांनाच दिला गेला आहे. काही राज्य सरकारांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य मूल्यवर्धित कराचे (state VAT ) दर देखील कमी केले आहेत. मार्च 2024 मध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती प्रति लिटर मागे 2 रुपयांनी कमी केल्या आहे.
सद्यस्थितीत भारत हा जगातील प्रमुख देशांमधील असा एकमेव देश आहे जिथे अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2025 या कालावधी दरम्यान जगातील काही प्रमुख देशांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेले बदल खाली दिले आहेत :
% age Change in Prices between Nov-21 and Jan-25
|
Country
|
Petrol
|
Diesel
|
India (Delhi)
|
-13.60%
|
-10.92%
|
France
|
14.21%
|
15.08%
|
Germany
|
7.87%
|
12.43%
|
Italy
|
8.65%
|
11.39%
|
Spain
|
8.67%
|
12.93%
|
UK
|
0.08%
|
2.61%
|
Canada
|
10.52%
|
23.05%
|
USA
|
4.83%
|
12.86%
|
नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2025 या कालावधी दरम्यान भारताच्या काही शेजारील देशांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेले बदल खाली दिले आहेत
% age Change in Prices between Nov-21 and Jan-25
|
Country
|
Petrol
|
Diesel
|
India (Delhi)
|
-13.60%
|
-10.92%
|
Pakistan
|
29.76%
|
34.97%
|
Bangladesh
|
13.94%
|
30.82%
|
Sri Lanka
|
53.98%
|
101.59%
|
Nepal
|
22.02%
|
31.32%
|
भारतात देशांतर्गत वापरल्या जाणाऱ्या एलपीजी अर्थात द्रवरुप पेट्रोलिअम वायु इंधनापैकी सुमारे 60% इतके इंधन आयात करावे लागते. त्यामुळेच देशातील एलपीजीची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीशी जोडलेली आहे. सरासरी सौदी करार दर [Saudi CP - Saudi Contract Price (एलपीजीच्या किंमतीसाठीचे आंतरराष्ट्रीय मानक)] 63% ने वाढला (जुलै 2023 मधील प्रति मेट्रिक टनासाठी 385 अमेरिकी डॉलरवरून फेब्रुवारी 2025 मध्ये प्रति मेट्रिक टनासाठी 629 अमेरिकी डॉलर इतकी वाढ झाली). असे असतानाही, घरगुती वापरासाठीच्या एलपीजीकरता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी प्रत्यक्षातील किंमत 44% ने कमी करण्यात आली (ऑगस्ट 2023 मध्ये ही किंमत 903 रुपये होती, फेब्रुवारी 2025 मध्ये ती कमी करून 503 रुपये केली गेली).
सध्या देशात दिल्ली मधील 14.2 किलोच्या घरगुती वापराच्या एलपीजी इंधन टाकीचा किरकोळ विक्री दर 803 रुपये इतका आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना इंधनाच्या प्रत्येक टाकीमागे 300 रुपयांचे लक्ष्यित अनुदान दिल्यानंतर, भारत सरकार हीच 14.2 किलो एलपीजी इंधनाची टाकी प्रत्येकी 503 रुपये (दिल्लीत) या प्रभावीत दराने वितरीत करत आहे. ही सुविधा देशभरातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या 10.33 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हा अशा प्रकारचा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 100 दशलक्षापेक्षा जास्त गरीब कुटुंबांना प्रति किलो फक्त 35 रुपये या प्रभावीत दराने घरगुती एलपीजी इथंन पुरवले जाते. याचबरोबरीने 01.01.2025 रोजीपर्यंतच्या भारताच्या शेजारील देशांमधील घरगुती एलपीजी इंधन टाकीची प्रभावीत किंमत खाली दिली आहे.
Country
|
Domestic LPG (Rs./14.2 kg.cyl.)
|
India
|
503.00*
|
Pakistan
|
1094.83
|
Sri Lanka
|
1231.53
|
Nepal
|
1206.65
|
भारत सरकार जागतिक ऊर्जा बाजारांवर तसेच बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठ्यात येऊ शकणाऱ्या संभाव्य अडथळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच कच्च्या तेलाच्या आयातीसंदर्भातले एकाच प्रदेशावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी त्यांच्या पेट्रोलियम आयातीसंबंधीच्या पर्यायांमध्येही विविधता आणली आहे, आणि त्यानुसार विविध भौगोलिक प्रदेशांतील देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे.
ही माहिती आज राज्यसभेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी एका लेखी उत्तरात दिली आहे.
S.Kakade/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114626)
Visitor Counter : 32