कृषी मंत्रालय
शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे तसेच त्यांच्या मालाला रास्त भाव मिळेल याची सुनिश्चिती करण्याला मोदी सरकारने सर्वाधिक प्राधान्य दिले असून ही सरकारची बांधिलकी आहे: केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क संपूर्णपणे रद्द केले आहे : शिवराज सिंह चौहान
शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कांदा जागतिक बाजारपेठेत पोहोचायला हवा आणि त्यांना लाभदायक किंमत मिळायला हवी : केंद्रीय कृषीमंत्री
Posted On:
24 MAR 2025 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की मोदी सरकार हे शेतकरी-स्नेही सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळवून देणे याला सरकारचा प्राधान्यक्रम आहे तसेच ती सरकारची बांधिलकी आहे. सुरुवातीला कांद्यावर 40% निर्यात शुल्क होते. मात्र जेव्हा कांद्याचे भाव गडगडले आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावात घसरण होऊ लागली तेव्हा सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वरुन कमी करून 20% केले. कांद्यावरील 20%निर्यात शुल्कदेखील संपूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
कांद्यावरील निर्यात शुल्क संपूर्णपणे रद्द केल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने घेतलेले उत्पादन जागतिक बाजारांपर्यंत कुठल्याही शुल्काशिवाय पोहोचू शकेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला खात्रीलायकरित्या चांगला आणि अधिक फायदेशीर भाव मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला.

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114393)
Visitor Counter : 48