ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी ओदिशातील वीज क्षेत्राचा घेतला आढावा
Posted On:
23 MAR 2025 3:21PM by PIB Mumbai
केंद्रीय वीज आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री, मनोहर लाल यांनी भुवनेश्वर येथे भेट दिली आणि ओदिशा सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्याच्या वीज क्षेत्राच्या विकासावर सविस्तर आढावा घेत बैठक घेतली.
या चर्चेमध्ये महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता, जसे की फ्लाय ऍशचा उपयोग, क्षमता वाढ, प्रसारण पायाभूत सुविधा आणि वीज वाटप.
फ्लाय ऍशचा उपयोग करण्याच्या उद्दिष्टांबाबत, मनोहर लाल यांनी आश्वासन दिले की कोळसा मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीसाठी पुरेसे रेल्वे रेक्स उपलब्ध करून देण्यासह संपूर्ण समस्येचा विचार केला जाईल.


वाढती वीज मागणी पूर्ण करण्याच्या गरजेवर भर देताना, राज्य सरकारने माहिती दिली की सध्या ओदिशामध्ये 20 गिगावॅट कोळशावर आधारित कार्यरत औष्णिक वीज निर्मिती क्षमता आहे, तसेच पुढील 10 गिगावॅट निर्मिती क्षमता विकसित केली जात असून ती पुढील 5-6 वर्षांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्र्यांनी ओदिशामध्ये इतर राज्यांच्या जीइएनओसी कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून अधिक पिट-हेड औष्णिक वीज प्रकल्प विकसित करण्यास प्रोत्साहन दिले.
प्रसारणाच्या बाबतीत, ओदिशाने आपले राज्यांतर्गत नियोजन धोरण आणि भुवनेश्वर व कटकसारख्या शहरांचा वीज पुरवठा मजबूत करण्याच्या अलीकडील प्रगतीची माहिती दिली. तसेच, ओदिशा पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (ओपीटीसीएल) ने 'राईट ऑफ वे' (आरओडब्ल्यू) संबंधित समस्या सोडवण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती मंत्र्यांना दिली. त्यांनी सांगितले की ओदिशाच्या राज्यांतर्गत वीज पारेषण जाळ्यात ग्रीन एनर्जी कॉरिडॉर स्थापन करण्याचा प्रस्ताव 31 मार्च 2025 नंतर एमएनआरई कडून विचारात घेतला जाईल, आणि त्यापूर्वी संकलन प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114187)
Visitor Counter : 35