अर्थ मंत्रालय
करचोरी रोखण्यासाठी डीजीजीआयने ऑफशोअर ऑनलाइन मनी गेमिंग कंपन्यांवर केली कारवाई
Posted On:
22 MAR 2025 2:38PM by PIB Mumbai
वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाने (DGGI) ऑफशोअर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांविरुद्धच्या अंमलबजावणीच्या कारवाई अधिक तीव्र केल्या आहेत. ऑनलाइन मनी गेमिंग उद्योगात देशांतर्गत आणि परदेशी अश्या दोन्ही ऑपरेटर्सचा समावेश आहे. जीएसटी कायद्यांतर्गत, 'ऑनलाइन मनी गेमिंग', कारवाईयोग्य दावा/क्लेम समजला जात असल्याने, 'वस्तूंचा' पुरवठा म्हणून त्याचे वर्गीकरण होते. वस्तु म्हणून वर्गीकरण झाल्याने त्यावर 28% कर आकारला जातो. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना/कंपन्यांना जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पैशांच्या गेमिंग/बेटिंग/जुगाराच्या (सुविधा) पुरवठ्यात सहभागी असलेल्या सुमारे 700 ऑफशोअर संस्था डीजीजीआयच्या निरीक्षणाl आढळल्या आहेत. योग्य नोंदणी न करून, करपात्र पे-इन लपवून आणि कर दायित्वांना टाळून या संस्था/कंपन्या जीएसटी टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समन्वयाने, आयटी कायदा, 2000 च्या कलम 69 अंतर्गत, डीजीजीआयने बेकायदेशीर/अनुपालन न करणाऱ्या ऑफशोअर ऑनलाइन मनी गेमिंग संस्थांची 357 संकेतस्थळे/यूआरएल ब्लॉक केली आहेत.
काही बेकायदेशीर गेमिंग प्लॅटफॉर्म्सविरुद्ध अलिकडच्याच कारवाईत, DGGI ने I4C आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या समन्वयाने सहभागींकडून पैसे वसूल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांना लक्ष्य करण्यात आले आणि ते ब्लॉक देखील करण्यात आले. जवळजवळ 2,000 बँक खात्यांवर टाच आणण्यात आली असून 4 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. दुसऱ्या एका कारवाईत, यापैकी काही ऑफशोअर संस्थांच्या/कंपन्यांच्या संकेतस्थळावर आढळलेल्या UPI आयडीशी जोडलेली 392 बँक खाती डेबिट फ्रीजवर ठेवण्यात आली आहेत आणि या खात्यांमध्ये एकूण 122.05 कोटी रुपयांची रक्कम तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
भारताबाहेरून ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या काही भारतीय नागरिकांविरुद्ध डीजीजीआयने आणखी एक कारवाई केली. त्यात असे दिसून आले की या व्यक्ती सतगुरु ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म, महाकाल ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म आणि अभि247 ऑनलाइन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म यासारख्या विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय ग्राहकांना ऑनलाइन मनी गेमिंगची सुविधा देत होते आणि भारतीय ग्राहकांकडून पैसे गोळा करण्यासाठी खेचर बँक खात्यांचा वापर करत होते. डीजीजीआयने आतापर्यंत या प्लॅटफॉर्मशी संबंधित 166 म्यूल (Mule) खाती ब्लॉक केली आहेत. आतापर्यंत अशा तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि अशा आणखी व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू आहे.
***
M.Pange/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114091)
Visitor Counter : 55