सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक सिंग ठाकूर यांची निवड

Posted On: 22 MAR 2025 6:40PM by PIB Mumbai

 

भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेची (INTACH) वार्षिक सर्वसाधारण सभा नवी दिल्लीतील मुख्य कार्यालयात 22 मार्च 2025 रोजी झाली. या बैठकीत अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांची निवडणूक पार पडली. योग्य प्रक्रियेनंतर निकाल जाहीर करण्यात आले. त्यानुसार अशोक सिंग ठाकूर यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

INTACH ही भारतातील प्रमुख वारसा संवर्धन संस्था असून 27 जानेवारी 1984 रोजी या संस्थेची औपचारिक स्थापना झाली होती. सोसायटी नोंदणी कायदा (1860) अंतर्गत स्थापित ही एक राष्ट्रीय नोंदणीकृत संस्था आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, अतुल्य वारसा पुनरुज्जीवित करणे आणि आपल्या समृद्ध वारशाची प्रशंसा करणे आणि त्याबाबत नव्या पिढ्यांना जागरुक करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. सांस्कृतिक, नैसर्गिक स्रोत आणि वारसा तसेच सांस्कृतिक आणि नवोन्मेषी उपक्रमांच्या जतनासाठी आर्थिक आणि तांत्रिक कौशल्य प्रदान करण्यासाठी सांस्कृतिक बँक म्हणून देखील ही संस्था काम करते. INTACH सनद 2004 मध्ये स्वीकारण्यात आली असून भारतातील वारसा संवर्धनाबाबत मार्गदर्शन करणारा पायाभूत दस्तऐवज म्हणून ही सनद वापरली जाते. वारशाचे विकसित होत जाणारे स्वरूप ओळखून ही संस्था सध्या सनद आंतरविद्याशाखीय बनवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचे काम करत आहे. यामुळे सनदेत मूर्त आणि अमूर्त ते नैसर्गिक आणि सांस्कृतिक परिमाणांपर्यंत वारशाच्या सर्व पैलूंचा समावेश होणे सुनिश्चित होईल.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2114066) Visitor Counter : 70


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil