वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदेतील प्रश्नोत्तरे : यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना

Posted On: 21 MAR 2025 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मार्च 2025

 

केंद्र सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे विविध कल्याणकारी उपाययोजना राबवण्याच्या माध्यमातून यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या उपाययोजनांअतर्ग  यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांच्या मुलांचे शिक्षण आणि कल्याणकारी योजनांची उपलब्धता अशा सेवा सुविधांचा समावेश आहे. यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांना विमा सुरक्षेचे कवच देता यावे या उद्देशाने केंद्र सरकारने, 1 जुलै 2003 रोजी यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांसाठी गट विमा योजना (Group Insurance Scheme for Powerloom Workers - GIS) सुरू केली होती, त्यानंतर या योजनेत सुधारणा करून तिला 2019-20 मुदतवाढ दिली गेली होती. याच बरोबरीने या योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेले कामगार हे शिक्षण सहाय्य योजने  (Shiksha Sahayog Yojana - SSY) अंतर्गत, प्रत्येक मुलासाठी दरवर्षी 1,200 रुपये इतके शैक्षणिक अनुदान मिळण्यासाठीही पात्र आहेत. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलांसाठी दिला जात असून, त्याअंतर्गत इयत्ता IX ते XII मध्ये शिकणाऱ्या मुलांकरता चार वर्षांपर्यंत हा लाभ दिला जात आहे. याशिवाय 2017 जीवन आणि अपघाती विमा सुरक्षेच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने 2017 सालापासून यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांसाठी गट विमा योजनेचे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana - PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana - PMSBY) योजनेसोबत एकात्मिकरणही केले गेले आहे.

केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan Scheme - PM-SYM) देखील सुरू केली आहे, या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील पात्र कामगारांना, ज्यामध्ये यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांचाही समावेश आहे, त्या सर्व कामगारांना वयाच्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये इतके निश्चित निवृत्ती वेतन दिले जाणार आहे.

ही माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी आज लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

 

* * *

JPS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2113632) Visitor Counter : 43


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil