भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोग ईपीआयसी आणि आधार परस्परांना जोडण्यासाठी या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ,कलम 326,आरपी कायदा 1950 नुसार कार्यवाही करणार
यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तज्ञांमध्ये या संदर्भात लवकरच तांत्रिक चर्चा सुरू होणार
Posted On:
18 MAR 2025 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
भारतीय निवडणूक आयोगाने, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंह संधू आणि डॉ विवेक जोशी यांच्या समवेत आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृह सचिव, सचिव विधिमंडळ विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान(MEITY) सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक आयोजित केली.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 नुसार केवळ भारतीय नागरिकांनाच मतदानाचा अधिकार दिला जाऊ शकतो, आधार कार्ड केवळ व्यक्तीची ओळख प्रस्थापित करते. म्हणूनच ईपीआयसी सोबत आधारची जोडणी राज्यघटनेच्या कलम 326, लोकप्रतिनिधी कायदा 1950 चे कलम 23(4), 23(5) आणि 23(6)च्या तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाने WP (civil) No. 177/2023 मध्ये दिलेल्या निकालाला अनुसरून करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांमध्ये लवकरच चर्चा सुरू होणार आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112505)
Visitor Counter : 35