वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या 89व्या बैठकीत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा


एनपीजीने रस्ता, रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांबाबत घेतला आढावा

Posted On: 14 MAR 2025 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मार्च 2025

 

नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (एनपीजी) च्या आज झालेल्या 89व्या बैठकीत रस्ता, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) चे संयुक्त सचिव पंकज कुमार होते. या बैठकीत पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा (पीएमजीएस एनएमपी) च्या अनुषंगाने बहुपर्यायी कनेक्टीव्हिटी  आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यावर भर देण्यात आला.

एनपीजीने आठ प्रकल्पांचे मूल्यमापन केले. त्यामध्ये चार रस्ते, तीन रेल्वे आणि एका मेट्रो प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे एकीकृत बहुआयामी पायाभूत सुविधा ,सामाजिक आणि आर्थिक भागांच्या अखेरच्या टोकापर्यंत कनेक्टीव्हिटी  आणि इंटरमोडल समन्वय या पीएम गतीशक्ती योजनेच्या तत्वांना अनुसरून हे मूल्यमापन करण्यात आले.     

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 

  1. मेघालय मध्ये दारुगिरी ते डालू विभाग दुपदरी रस्त्याचे पक्के बांधकाम
  2. ब्रह्मपुत्रा नदीच्या दोन बाजू जोडणारा गोहपूर ते नुमालीगढ चौपदरी बोगदा
  3. कालियाबोर ते नुमालीगढ रस्त्याचे चौपदरीकरण आणि सुधारणा
  4. मायजिलार ते जैसलमेर या दुपदरी रस्त्याचे बांधकाम आणि जैसलमेर बाह्यवळण रस्ता

रेल्वे मंत्रालय

1. बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार

32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय. बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ  अपेक्षित.

2. नेरगुंडी ते कटक रेल्वेमार्गावर चौथ्या पदराचे बांधकाम आणि नेरगुंडी इथे उड्डाणपूल

15.99 किमी लांबीचा हा ब्राउनफिल्ड प्रकल्प ओदिशातील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी, मालवाहतुकीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण. हा मार्ग पारादीप बंदर, तालचेर कोळसा खाणी, तसेच महत्त्वाच्या पोलाद आणि वीज उद्योगांसाठी फायदेशीर ठरेल.

3. हरिदासपूर ते पारादीप रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण

74.09 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे ओदिशामध्ये मालवाहतुकीसह एकूणच वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा अपेक्षित. तालचेर कोळसा खाणींपासून पारादीप बंदरापर्यंत कोळशाची सुलभ अखंड वाहतूक अपेक्षित आणि अंगुल-झारसुगुडा औद्योगिक क्षेत्राचा वेगवान विकास.

गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय

राजकोट मेट्रो रेल्वे प्रकल्प

राजकोट मेट्रो रेल्वे प्रकल्प हा ग्रीनफिल्ड शहरी परिवहन उपक्रम राजकोट शहरात वाहतुकीची कोंडी कमी करणारा वाहतुकीचा पर्याय म्हणून महत्त्वपूर्ण.

हे सर्व पायाभूत प्रकल्प पीएमजीएस एनएमपीच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहेत. यामुळे देशातील विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक तसेच राष्ट्रीय आर्थिक वाढीला  चालना मिळेल.

 

* * *

N.Chitale/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2111419) Visitor Counter : 17