उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींकडून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2025 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2025
होळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना मनापासून शुभेच्छा.
होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूचे आगमन. होळी ही नवीन सुरुवात आणि नवीन दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. या आवडत्या परंपरेचा उत्सव साजरा करताना होळीतून प्रतीत होत असलेल्या एकतेच्या भावनेचा आपण स्वीकार करुया. होळीचे तेजस्वी रंग आपल्याला भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेची आठवण करून देतात जे , एकमेकांत मिसळत आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे एक सुंदर चित्र रेखाटतात.
आपल्या विचारांना करुणेने, आपल्या कृतींना कनवाळुपणाने आणि महान राष्ट्राच्या आपल्या दृष्टिकोनाला आशेने रंगवण्याचे स्मरण ही होळी आपल्याला करू दे.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2111354)
आगंतुक पटल : 72