गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुजरातमध्ये अहमदाबाद येथील अनेक विकास कामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात, स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात यापूर्वीच्या सरकारांनी केलेल्या विकासापेक्षा जास्त विकास झाला आहे
Posted On:
13 MAR 2025 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद येथील 146 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास कामांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि पायाभरणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासीयांना होळीच्या सणाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. आज तीन प्रकल्पांचे ई-उद्घाटन होत आहे आणि ई पायाभरणी होत आहे, असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधांचा विचार करायचा झाला तर सध्या गुजरात भारतामध्ये पहिल्या स्थानावर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशासह गुजरात लक्षणीय प्रगती करत आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले.
मोदी सरकारने राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यात गेल्या 10 वर्षात 60 टक्क्यांनी वाढ केली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांमधील सर्व सरकारांसोबत तुलना केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या काळात जास्त विकास झाला आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात चार पदरी महामार्गांच्या लांबीत अडीच पट वाढ झाली आहे, दररोज 36.5 किमी लांबीचे महामार्ग बांधले जात आहेत आणि आज देशात 157 विमानतळ आहेत, असे शाह म्हणाले.


* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111317)