माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 – एक्सआर क्रिएटर हॅकेथॉन पाटणा संमेलनात विस्तारित वास्तव क्षेत्रातील नवोन्मेष आणि सहयोगाचे महत्त्व अधोरेखित
Posted On:
11 MAR 2025 7:20PM
|
Location:
PIB Mumbai
पाटणा/मुंबई, 11 मार्च 2025
दिनांक 8 मार्च 2025 रोजी एक्सआर क्रिएटर हॅकेथॉनच्या पाटणा येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या विस्तारित वास्तव (एक्सआर) क्षेत्राच्या क्षमतेचे दर्शन घडवत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचे अनोखे एकीकरण बघायला मिळाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 मधील ‘क्रिएट इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून एक्सआर तंत्रज्ञानांच्या बाबतीत बिहारमध्ये वाढत असलेल्या रुचीचे तसेच प्रतिभेचे दर्शन घडले. एक्सआर क्रिएटर हॅकेथॉन हा विस्तारित वास्तव क्षेत्रातील तंत्रज्ञानांमध्ये अभिनवतेला चालना देणारा देशव्यापी उपक्रम असून भारतभरातील दीडशेहून अधिक शहरांतील 2,200 पेक्षा जास्त स्पर्धक यापूर्वीच सदर उपक्रमात सहभागी झाले आहेत.
वेव्हज एक्सआर क्रिएटर हॅकेथॉन (एक्ससीएच) ही एक अग्रणी स्पर्धा असून ती देशभरातील तंत्रज्ञान विकासकांना वर्धित तसेच आभासी वास्तव क्षेत्रातील नवनव्या आघाड्यांचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. तंत्रज्ञानाशी होणारा मानवी संवाद पुनर्परिभाषित करणाऱ्या अत्याधुनिक नाविन्यपूर्ण संशोधनांसाठी प्राथमिक मंच स्वरुपात कार्य करणाऱ्या एक्ससीएच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वेव्हलॅप्स, भारतएक्सआर तसेच एक्सडीजी यांच्याशी भागीदारी केली आहे.

सदर कार्यक्रमात आयआयटी पाटणामधील विभागप्रमुख डॉ.राजीव मिश्रा; ओप्लस कोवर्कचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष प्रीतीश आनंद, वेव्हलॅप्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आशुतोष कुमार तसेच सोनिक रेंडरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सूरज विश्वकर्मा यांच्यासह अनेक मान्यवर वक्त्यांनी भाग घेतला. भारताच्या तंत्रज्ञानविषयक क्षमतांमध्ये प्रगती करण्यात उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्नांचे महत्त्व या कार्यक्रमाने अधोरेखित केले.
एनईएआर या एक्सआर क्रिएटर हॅकेथॉनच्या तिसऱ्या फेरीतील अंतिम विजेत्या संघाची उपस्थिती हा या कार्यक्रमाचा उल्लेखनीय आकर्षणबिंदू ठरला. या संघातील स्पर्धकांनी हॅकेथॉनमधील सहभागाच्या लाभांविषयी स्वतःचे विचार सामायिक करत या स्पर्धेतील त्यांचा प्रवास तसेच भारतातील पहिल्या समाज एआर ॲपनिर्मितीचा प्रभाव सामायिक केला.

डॉ.राजीव मिश्रा यांनी संस्कृती संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रांच्या संदर्भात एक्सआरच्या क्षमतेचे दर्शन घडवत मिश्र वास्तव प्रकारात नालंदा विद्यापीठाच्या पुनर्निर्मितीचा एक अद्भुत प्रकल्प सादर केला. यापाठोपाठ प्रीतीश आनंद यांनी बिहार राज्याच्या स्टार्ट अप धोरणात योगदान देणाऱ्या बिहारमधील स्टार्ट अप परिसंस्थेविषयी अनमोल विचारधन सामायिक केले. बिहारमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकतेची जोपासना करण्याचे महत्त्व त्यांनी ठळकपणे मांडले. सदर कार्यक्रमाने बिहारच्या डिजिटल परिदृश्यात एक्सआर तंत्रज्ञानांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2110467)
| Visitor Counter:
43