माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सिम्फनी ऑफ इंडिया
Posted On:
11 MAR 2025 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2025
वेव्ह्स समिटमधील भव्य म्युझिकल चॅलेंज
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (WAVES), वेव्ह्ज , अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदे अंतर्गत, सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज या स्पर्धेत देशभरातील सर्वोत्तम संगीत प्रतिभेचे प्रदर्शन होणार असून, एका अभूतपूर्व सांगीतिक प्रवासासाठी व्यासपीठ सज्ज झाले आहे.
या स्पर्धेला सुरुवातीपासूनच भरभरून प्रतिसाद लाभला असून, कठोर निवड प्रक्रियेनंतर नोंदणी करणाऱ्या एकूण 212 संगीतकारांपैकी 80 सर्वोत्तम शास्त्रीय आणि लोककलावंतांनी भव्य अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे 1 ते 4 मे 2025 दरम्यान ही शिखर परिषद होणार आहे. ब्रॉडकास्टिंग अँड इन्फोटेनमेंट, एव्हीजीसी-एक्सआर, डिजिटल मीडिया अँड इनोव्हेशन आणि फिल्म्स या चार प्रमुख आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करत, उद्याच्या भारतीय मनोरंजन उद्योगाची झलक प्रदर्शित करण्यासाठी या क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व, निर्माते आणि तंत्रज्ञ वेव्स (WAVES) च्या व्यासपीठावर एकत्र येतील.
सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज, ब्रॉडकास्टिंग अँड इन्फोटेनमेंट या पहिल्या स्तंभांतर्गत आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव देणारा ठरेल. या ठिकाणी सादर होणार्या विविध प्रकारच्या सांगीतिक सादरीकरणांमुळे संगीत प्रेमींच्या वैविध्यपूर्ण अभिरुचीचा खऱ्या अर्थाने उत्सव साजरा होईल.
पात्रतेचे निकष

सिम्फनी ऑफ इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना पात्रतेच्या पुढील निकषांची पूर्तता करावी लागली:
प्रवेशिका दाखल करण्याची मार्गदर्शक तत्त्वे:
उमेदवारांनी त्यांच्या सादरीकरणासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले:
1. ऑडिशन साहित्य:
- प्रत्येक स्पर्धकाने आपली आगळी शैली, सांगीतिक कौशल्य आणि गुंतागुंतीच्या रचना हाताळण्याची क्षमता प्रतिबिंबित करणारी रेकॉर्डेड कामगिरी सादर करणे बंधनकारक आहे. गायकांनी कॉपीराइट नियमांचे कोणतेही उल्लंघन न करता, मूळ रचना सादर करणे आवश्यक आहे.
2. सादरीकरणाचा कालावधी:
- प्रत्येक सांगीतिक रचना जास्तीतजास्त 2 मिनिटे कालावधीची असावी.
3. विविधता:
- दाखल केलेल्या सादरीकरणाच्या तुकड्यात वेगळेपण असावे, आणि त्यामधून कलाकाराचे अष्टपैलुत्व आणि त्याच्या कलेची श्रेणी प्रदर्शित व्हावी.
4. सादरीकरणाचे स्वरूप:
- ध्वनिमुद्रण Mp4 फॉरमॅटमध्ये असावे.
- रेकॉर्डिंग 48 kHz, 16-बिट फॉरमॅटचे पालन करणारे असावे.
नोंदणी प्रक्रिया :
- ऑनलाइन नोंदणी: सर्व नोंदणी ऑनलाइन स्वीकारण्यात आली, नोंदणीसाठीची लिंक वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली.
- ऑडिशन सामग्री सादर करणे: वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ऑडिशन सामग्री याच व्यासपीठावर सादर करण्यात आली.
स्पर्धेच्या फेऱ्या:
- प्राथमिक फेरी: स्पर्धकांनी पाठवलेल्या रेकॉर्डिंगच्या आधारावर कठोर ऑनलाईन ऑडिशन प्रक्रियेच्या माध्यमातून स्पर्धक शॉर्टलिस्ट करण्यात आले. सर्वोत्तम 40-50 संगीतकारांची निवड केल्यानंतर चार विभागांमध्ये सिंफनी विभाजित करण्यात आली आणि स्पर्धकांना एक गट स्वरुपात पुढील स्पर्धेसाठी पाठवण्यात आले.
- उपांत्य आणि अंतिम फेऱ्या: उपांत्य फेरीसाठी सर्वोत्तम 8 सिंफनी गटांची निवड करण्यात आली. यातून 3 विजेते आणि 2 उपविजेते यांची निवड होईल.
- अंतिम विजेते: एकंदर 3 विजेते निवडण्यात येतील. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 5 विजेत्यांची निवड होईल.
- प्रसारण: दूरदर्शन आणि त्यांच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून 26 भागांच्या मालिकेच्या स्वरुपात सादरीकरणे आणि निकालांसह संपूर्ण स्पर्धेचे प्रसारण करण्यात येईल.
- प्रादेशिक प्रदर्शने: प्रादेशिक प्रदर्शनासाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांना प्रादेशिक केंद्र पातळीवरील कार्यक्रमात सर्वात आशादायक कलाकार म्हणून मान्यता मिळवत आपली कला सादर करावी लागेल.
- महाअंतिम फेरी: प्रादेशिक पातळीवरील सादरीकरणातून निवडण्यात आलेले सर्वोत्कृष्ट कलाकार महा अंतिम फेरीत भाग घेतील.
कलाकारांमध्ये सामुदायिक भावना, नवोन्मेष आणि विकासाची भावना जोपासतानाच त्यांच्यातील सर्जनशीलता आणि संगीत निर्मितीच्या सीमा ओलांडण्यात मदत करणे हे सिंफनी ऑफ इंडिया स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. युवा प्रतिभांचे संगोपन तसेच जगभरातील प्रेक्षकांना ताज्या सांगीतिक अनुभवाची अनुभूती देण्यासाठी वेव्हज हा प्रमुख मंच ठरण्यासाठी सज्ज झाला आहे.
सदर स्पर्धा महावीर जैन फिल्म्सच्या समन्वयासह दूरदर्शनतर्फे निर्मित आणि ज्येष्ठ कार्यक्रम दिग्दर्शक श्रुती अनिन्दिता वर्मा यांनी दिग्दर्शित केली आहे. प्रतिभावंत कलाकार गौरव दुबे यांच्या सूत्रसंचालनात पद्मश्री सोमा घोष, गायिका श्रुती पथक आणि लोककला गायक स्वरूप खान हे मान्यवर या स्पर्धेचे परीक्षण करत आहेत. या कार्यक्रमासाठी तालवादक तौफिक कुरेशी, बासरीवादक पद्मश्री रोणू मजुमदार, व्हायोलीन वादक सुनिता भूयान, तालवादक पंडित दिनेश, तन्मय बोस,लेस्ली लुईस आणि बासरीवादक राकेश चौरासिया यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतीय प्रतिभावंत मार्गदर्शन करणार आहेत.

एकल सादरीकरणापासून सुरू झालेली ही स्पर्धा आता चार सदस्यांच्या गटांमध्ये विलीन झाली असून त्यानंतर आठ आणि मग 10 संगीतकारांच्या गटात विलीन होईल. हे संगीतकार सांगीतिक प्रतिभावंतांची आश्चर्यकारक सिंफनी निर्माण करण्यासाठी अस्सल संगीताचे सर्जन करतील आणि जुन्या लोकसंगीताला पुनरुज्जीवित करतील. प्रत्येकी 10 संगीतकारांचा एक गट असे सर्वोत्तम 3 गट मिळून महा सिंफनी तयार करतील आणि त्यांना प्रतिष्ठित वेव्हज मंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. या मालिकेतील तीन विजेते संघ उत्साही प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर करतील. यातून त्यांना एकमेकांशी स्पर्धा करण्यासोबतच नव्या पद्धती, शैली आणि सांगीतिक प्रभावांची सुरुवात देखील करता येईल.
सामान्य अटी:
- परीक्षकांचा निर्णय: सुविख्यात परीक्षक मंडळ तसेच प्रादेशिक पातळीवरील परीक्षक यांचा निर्णय अंतिम असेल आणि तो सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.
- परवानगी: आपापली सादरीकरणे प्रसारभारतीकडे पाठवून स्पर्धक त्यांचे कार्यक्रम प्रसारभारतीतर्फे परिचालित सर्व मंचांवर प्रसारित करण्याची आणि जाहिरात करण्याचा अधिकार प्रसारभारतीला देत आहेत.
- खर्च: राज्यस्तरीय ऑडिशन्स दरम्यान तसेच नंतरच्या फेऱ्यांसाठी आवश्यक असलेला प्रवास तसेच निवासाचा खर्च स्वतः करणे अपेक्षित आहे.
Reference
Click here to see PDF:
* * *
S.Kane/Rajshree/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110355)
Visitor Counter : 26