कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे वर्ष 2024-25 साठीचा प्रमुख कृषी पिकांच्या (खरीप आणि रबी) उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी केला
Posted On:
10 MAR 2025 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे वर्ष 2024-25 साठीचा प्रमुख कृषी पिकांच्या (खरीप आणि रबी) उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी केला आहे.केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वाच्या कृषी पिकांचा डाटा मंजूर करून तो जारी करताना सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे.केंद्रीय कृषी मंत्रालय विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत तसेच प्रोत्साहन देत असून त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

राज्यांकडून मिळालेली लागवड क्षेत्राबद्दलची माहिती दूरस्थ संवेदके, साप्ताहिक पीक हवामान निरीक्षण गट आणि इतर संस्थांकडून प्राप्त माहितीशी प्रमाणित करून बघण्यात आली आहे. तसेच उद्योगांचे प्रतिनिधी तसेच इतर सरकारी विभागांचे प्रतिनिधी यांची खरीप आणि रबी हंगामाच्या संदर्भातील मते, दृष्टीकोन आणि भावना जाणून घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने हितधारक सल्लामसलत उपक्रम आयोजित केला. यातून हाती आलेले निष्कर्ष देखील अंदाजांना अंतिम स्वरूप देताना विचारात घेण्यात आले आहेत. तसेच, पीक उत्पादनाविषयीचे हे अंदाज पीककापणीचे अनुभव (सीसीईज), भूतकाळातील कल आणि इतर सहयोगी घटकांवर आधारित आहेत.
यावर्षी खरीप हंगामात 1663.91 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल तर रबी हंगामात 1645.27 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खरीपातील पिकांच्या उत्पादनाचा अंदाज तयार करताना पीककापणीच्या (सीसीई )अनुभवांवर आधारित उत्पादन विचारात घेण्यात आले आहे.तसेच तूर, ऊस, एरंड यांसारख्या काही पिकांच्या सीसीईज अजून सुरु आहेत. रबी पिकांचे उत्पादनविषयक अंदाज सरासरी उत्पादनावर आधारित असून सीसीईजवर आधारलेले उत्पादनाचे अधिक चांगले अंदाज प्राप्त झाल्यानंतर लागोपाठच्या अंदाजात बदल होऊ शकतात.विविध उन्हाळी पिकांचे उत्पादन आगामी तिसऱ्या आगाऊ अंदाजांमध्ये समाविष्ट करण्यात येतील.
हे अंदाज मुख्यतः राज्य सरकारांकडून प्राप्त माहितीवर आधारलेले असतात. उपरोल्लेखित दुसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनाविषयी अंदाज व्यक्त करण्यात आले असून उन्हाळी हंगामातील पिकांच्या उत्पादनाविषयीची माहिती तिसऱ्या आगाऊ अंदाजात समाविष्ट करण्यात येईल.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109935)
Visitor Counter : 28