वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नवोन्मेष, शाश्वतता आणि रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी डीपीआयआयटी आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया आले एकत्र
Posted On:
07 MAR 2025 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2025
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारताच्या उत्पादन परिसंस्थेला चालना देण्यासाठी, रस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरण टिकवण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या भागीदारीचा उद्देश स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि उद्योजकांना तांत्रिक प्रगती साध्य करण्यात आणि सामाजिक विकास घडवून आणण्यात मदत करणे हा आहे.
या सहकार्याचा मुख्य भर संरचित कार्यक्रम तयार करण्यावर असेल, जे स्टार्टअप्सना पायाभूत सुविधा, मार्गदर्शन, वित्तीय संधी आणि बाजाराशी जोडणी उपलब्ध करून देतील. तसेच, या उपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्यांना चालना दिली जाईल आणि दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण सुनिश्चित केली जाईल.
या प्रसंगी बोलताना डीपीआयआयटी चे सहसचिव संजीव यांनी सांगितले की, मर्सिडीज-बेंझ इंडियासोबतची ही भागीदारी भारताच्या उत्पादन क्षमतांना बळकट करण्यासाठी आणि जबाबदार व शाश्वत नवोपक्रमांना चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी यावर भर दिला की, हे सहकार्य "उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील संबंध मजबूत करेल आणि प्रभावी तांत्रिक प्रगती घडवून आणणारी परिसंस्था निर्माण करेल."
मर्सिडीज-बेंझ इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक संतोष अय्यर यांनी या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, रस्ते सुरक्षा, पर्यावरण रक्षण आणि प्रगत उत्पादन या त्यांच्या कंपनीच्या मुख्य उद्दिष्टांशी हे सहकार्य सुसंगत आहे. त्यांनी नमूद केले की, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीद्वारे, मर्सिडीज-बेंझ इंडिया इनक्युबेटर आणि शैक्षणिक संस्थांसोबत घनिष्ठपणे कार्य करून समाजावर सकारात्मक प्रभाव पाडेल.
हा सामंजस्य करार डीपीआयआयटी चे संचालक डॉ. सुमीत कुमार जरंगल आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक संतोष अय्यर यांच्या हस्ते, दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109304)
Visitor Counter : 17