माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारत: बर्डस आय व्ह्यू चॅलेंज
Posted On:
04 MAR 2025 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 04 मार्च 2025
आकाशातून भारताची छबी टिपा
प्रस्तावना
क्रिएट इन इंडिया आव्हानाचा भाग असलेली द वेव्हज इंडिया: विहंगावलोकन स्पर्धा हवाई सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून भारताचे चित्तवेधक सौंदर्य आणि वैविध्य टिपण्यासाठी ड्रोन चालकांना आमंत्रित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना पक्षांच्या दृष्टीने देशातील निसर्गरम्य भूप्रदेश, वारसास्थळे आणि रंगीबेरंगी जीवनाचे दर्शन घडवणारा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ चित्रित करायचा आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया (बीईसीआयएल) ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत 956 जणांनी नोंदणी देखील केली आहे.
हा उपक्रम म्हणजे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबई येथे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ गार्डन्स येथे आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज)निमित्ताने आयोजित विविधांगी आयोजनांचा एक भाग आहे. ही स्पर्धा माध्यमे, माहितीचा प्रसार तसेच मनोरंजन यांच्या उत्क्रांत होत असलेल्या परिदृश्यावर लक्ष केंद्रित करते.

वेव्हज चा भाग असलेली क्रिएट इन इंडिया आव्हाने आतापर्यंत 73,000 नोंदण्यांसह माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात सर्जनशीलतेला चालना देत आहेत. प्रतिभेचा अविष्कार करण्यासाठी मंच उपलब्ध करून देत हा उपक्रम जगभरातील सर्जकांना त्यात सहभागी करून घेत आहे. यातून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून भारताच्या भूमिकेला दुजोरा मिळतो आहे.
सहभागासाठी श्रेणी
खुला वर्ग
व्हिडीओ संकलक
व्यावसायिक ड्रोन चालक
चित्रपट निर्माते/ संघ/ विद्यार्थी/ वैयक्तिक उमेदवार
ड्रोन दीदी
भारत सरकारच्या ड्रोन दीदी योजनेच्या लाभार्थी
सुचवण्यात आलेल्या संकल्पना
भारताच्या समृध्द वारशाचे दर्शन
भारतभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतींचे ठळक दर्शन
भारतातील वैविध्यतेचा उत्सव
भारताच्या अद्वितीयतेवर भर
विविध क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या भारताचे दर्शन
भारतातील उत्तम पद्धतीने विकसित प्राचीन नागरी संस्कृतींचे दर्शन
आधुनिक विकसित भारताचे चित्र
भारतातील जनसामान्यांवर लक्षणीय प्रभाव पाडणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल माहितीचे सादरीकरण
ड्रोन दीदी कार्यक्रमाअंतर्गत अथवा समुदायांशी संबंधित इतर कोणतेही समाज कार्य यांसाठी ड्रोनचा केलेला वापर दर्शवणारा व्हिडीओ
मूल्यांकनाचे निकष
पहिली चाळणी प्रक्रिया
कार्यक्रमाचा दर्जा आणि आशय यांच्या आधारावर पहिली चाळणी प्रक्रिया म्हणून प्रत्येक विभागातील (ड्रोन दीदी आणि खुला वर्ग)सर्वोत्तम 10 व्हिडीओ अंतिम मूल्यमापनासाठी निवडण्यात येतील.
अंतिम निवड
प्रतिष्ठित संस्थांचे प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ञ यांच्या सुप्रसिध्द परीक्षक मंडळाकडून अंतिम मूल्यमापन करण्यात येईल.
विजेते
या स्पर्धेतील विजेत्यांचा मुंबईत आयोजित वेव्हज 2025 परिषदेत सन्मान करण्यात येईल.
अर्ज सादर करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
सध्या ही स्पर्धा केवळ नमो ड्रोन दीदी विभागातील स्पर्धकांसाठी खुली असून व्हिडीओ सादर करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे.
स्पर्धेसाठी सादर केलेला व्हिडीओ अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कौशल्याने तयार केलेला असावा आणि त्यात चित्तवेधक उत्तम दर्जाची दृश्ये असावीत.
या व्हिडिओचा एकंदर चित्रपटीय अनुभव आणखी उत्तम करण्याच्या दृष्टीने त्यात मनोवेधक आवाजाला व्यावसायिकसंगीताची जोड असावी.
हा व्हिडीओ अस्सल असावा आणि विशेष करून या स्पर्धेसाठी तयार केलेला असावा.
या व्हिडीओ मधून भारताचे चित्तवेधक सौंदर्य आणि वैविध्य यांचे दर्शन घडावे तसेच त्यातील विषय स्पर्धेसाठी आवश्यक संकल्पनांना अनुसरून असावा.
हा व्हिडीओ नक्कल करून घेतलेला, सुधारणा केलेला अथवा इतर कोणत्याही स्त्रोताकडून पुनर्निर्मिती केलेला नसावा.
व्हिडीओच्या फाईलचे स्वरूप एमपी4/एमपीईजी-4 अथवा एमओव्ही असावे.
स्पर्धेच्या दरम्यान विकसित कार्याचे सर्व हक्क केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय/वेव्हज कडे असतील.
पारितोषिके आणि सन्मान
सर्वोत्तम पारितोषिके
प्रत्येक विभागातील (ड्रोन दीदी आणि खुला वर्ग) पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान
उत्तेजनार्थ बक्षिसे
दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
प्रमाणपत्रे
प्रत्येक विभागात पहिल्या चाळणी प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या सर्व व्हिडिओजना डिजिटल प्रशंसा प्रमाणपत्रे देण्यात येतील.
महा गौरव
पारितोषिक विजेत्यांना मुंबईत आयोजित वेव्हज 2025परिषदेत लक्षवेधक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील.
निष्कर्ष
द वेव्हज इंडिया: भारत: बर्डस आय व्ह्यू चॅलेंज ही ड्रोन चालक आणि चित्रपट निर्मात्यांसाठी हवाई सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून भारतातील चित्तवेधक भूप्रदेश, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी अनोखी संधी आहे. असाधारण प्रतिभांना सन्मानित करून आणि पारितोषिके देऊन ही स्पर्धा माध्यमे, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान पुन्हा बळकट करत आहे.
संदर्भ :
https://wavesindia.org/challenges-2025
https://www.becil.com/wave-registration-detail
पीडीएफ फाईल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108225)
Visitor Counter : 19