पंचायती राज मंत्रालय
पंचायती राज मंत्रालय 4 मार्च 2025 रोजी एका राष्ट्रीय कार्यशाळेत “सशक्त पंचायत-नेत्री अभियान” सुरू करणार
1200 हून अधिक पंचायत महिला प्रतिनिधी सहभागी होणार; लिंगभाव-आधारित हिंसाचार कायद्यावरील प्राथमिक पुस्तक प्रकाशित केले जाणार
Posted On:
02 MAR 2025 1:24PM by PIB Mumbai
पंचायती राज मंत्रालय पंचायती राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करत आहे, ज्यामध्ये "सशक्त पंचायत-नेत्री अभियान" 4 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सुरू होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे उपस्थित राहणार आहेत. यूएन एफपीए, टीआर आय एफ यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सशक्त पंचायत-नेत्री अभियान हा देशभरातील पंचायती राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींसाठी क्षमता-निर्मिती हस्तक्षेपांना बळकटी देण्याच्या उद्देशाने एक धोरणात्मक उपक्रम आहे. याचा त्यांच्या नेतृत्व कौशल्याला धारदार करण्यावर, त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमता वाढविण्यावर तसेच तळागाळातील प्रशासनात त्यांची भूमिका मजबूत करण्यावर भर आहे. निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची ग्रामीण स्थानिक प्रशासनातील महत्त्वाची भूमिका ओळखून पंचायती राज मंत्रालयाने त्यांचे नेतृत्व अधिक सक्षम होण्यासाठी तसेच निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक धोरणात्मक पथदर्शी कार्यक्रम तयार केला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी प्रथमच, पंचायती राज संस्थांच्या (पी आर आय) तिन्ही स्तरांमधून निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी अर्थपूर्ण आणि कृती-केंद्रित संवादात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र येतील. विविध पार्श्वभूमी असलेल्या 1,200 हून अधिक पंचायत महिला नेत्या या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होतील.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पंचायतींमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उत्कृष्ट महिला नेत्यांचा सत्कार. निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या क्षमता वाढीसाठी या कार्यशाळेत विशिष्ट प्रशिक्षण मॉड्यूलचा शुभारंभ तसेच लिंगभाव आधारित हिंसाचार आणि निवडून आलेल्या पंचायत प्रतिनिधींसाठी हानिकारक प्रथांचा वेध घेणाऱ्या कायद्यावरील प्राथमिक पुस्तकाचा शुभारंभ देखील केला जाईल.
या राष्ट्रीय कार्यशाळेत स्थानिक प्रशासनात महिलांच्या सहभागासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर काळजीपूर्वक निवडलेल्या पॅनेल चर्चा होतील जसे की "पीआरआयमध्ये महिलांचा सहभाग आणि नेतृत्व: स्थानिक स्वराज्यातील गतिमानता बदलणे", ग्रामीण प्रशासन संरचनांमधील महिलांचे वाढलेले प्रतिनिधित्व कसे पुनर्बांधणी करत आहे याचे परीक्षण करणे आणि "महिला-नेतृत्वाखालील स्थानिक प्रशासन: डब्ल्यूईआरद्वारे क्षेत्रीय हस्तक्षेप", ज्यामध्ये आरोग्य आणि पोषण, शिक्षण, महिला आणि मुलींची सुरक्षितता आणि सुरक्षा, आर्थिक संधी आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा समावेश असेल.
***
S.Patil/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107561)
Visitor Counter : 77