कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेकडून भारतातील पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) क्षेत्रातील नेतृत्व मजबूत करण्यासाठी नॅशनल असोसिएशन ऑफ इम्पॅक्ट लीडर्स अर्थात नेल्स (NAILS) या बैठकीचे गोव्यात आयोजन
Posted On:
02 MAR 2025 12:38PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाअंतर्गत, भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेने गोव्यामध्ये नॅशनल असोसिएशन ऑफ इम्पॅक्ट लीडर्स (NAILS) बैठक 2025चे आयोजन केले. 100 हून अधिक सहभागींची उपस्थिती असलेल्या या ऐतिहासिक समारंभात, विचारांची देवाणघेवाण तसेच उदयोन्मुख शाश्वतता कल आणि जबाबदार आणि लवचिक कॉर्पोरेट भविष्याच्या दिशेने मार्गनिर्मिती करण्याच्या दृष्टीने पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) यामधील विख्यात व्यावसायिक, धोरणकर्ते आणि विचारवंत एकत्र आले होते. ही बैठक भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय भूषण प्रसाद पांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बौद्धिकदृष्ट्या प्रेरणादायी भाषणांसाठी मंच उपलब्ध करून देणाऱ्या या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेच्या स्कूल ऑफ बिझिनेस एन्व्हॉयरमेंट च्या प्रमुख आणि सहप्राध्यापिका गरीमा दधीच, यांच्या स्वागतपर तसेच संदर्भ निर्धारण सत्राने झाले. कॉर्पोरेट शाश्वततेमध्ये पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) नेतृत्वाचे वाढते महत्त्व त्यांनी स्पष्टपणे मांडले आणि जागतिक चौकटी विकसित होत असताना संघटनात्मक धोरणे जुळवून घेण्याची गरजही अधोरेखित केली.
या समारंभात, भारतीय कार्पोरेट व्यवहार संस्थेने, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या साहाय्याने होणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स ऑफ रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट (एनसीआरबीसी) विषयी असलेल्या महत्त्वाच्या त्यांच्या तिसऱ्या पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) वार्षिक परिषदेची घोषणा केली. ही परिषद 2 आणि 3 जुलै 2025 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. त्याची नोंदणी मार्च 2025 पासून सुरू होईल.

कॉर्पोरेट शाश्वततेच्या क्षेत्रात सातत्याने ज्ञानाची देवाणघेवाण, प्रभावी नेतृत्व आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था प्रमाणित नॅशनल असोसिएशन ऑफ इम्पॅक्ट लीडर्स (एनएआयएल) हे ईएसजी व्यावसायिक आणि प्रभावी नेतृत्वांसाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयाला येण्यास सज्ज आहे.
***
S.Tupe/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107532)
Visitor Counter : 50