वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या मूल्यांकनासाठी पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची 88वी बैठक
एनपीजी कडून रस्ते, रेल्वे, माहिती तंत्रज्ञान व मेट्रो प्रकल्पांचे मूल्यांकन
Posted On:
01 MAR 2025 11:29AM by PIB Mumbai
नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या आज झालेल्या 88व्या बैठकीत रस्ते, रेल्वे, माहिती तंत्रज्ञान व मेट्रो क्षेत्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) सहसचिव ई. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन (पीएमजीएस एनएमपी) नुसार विविधांगी जोडण्या व लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
एनपीजीने अकरा प्रकल्पांचे एकात्मिक विविधांगी पायाभूत सुविधा, (7- रोड, 2- रेल्वे, 1- माहीती तंत्रज्ञान व 1- मेट्रो) यांना आर्थिक तसेच सामाजिक नोड्सशी शेवटच्या घटकापर्यंत जोडणे व अंतर्गत समन्वय या पीएम गतिशक्ती तत्त्वांच्या अनुरूपतेसाठी मूल्यांकन करण्यात आले. या उपक्रमांमुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच प्रदेशांमध्ये महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक फायदे मिळतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
***
S.Pophale/R.Dalekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107282)