कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा क्षेत्रातील आणि व्यावसायिक कोळसा खाण लिलावातील गुंतवणुकीच्या संधींकडे लक्ष वेधण्यासाठी कोळसा मंत्रालय उद्या मुंबईत करणार रोड शोचे आयोजन

Posted On: 27 FEB 2025 9:40AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025

कोळसा क्षेत्रातील आणि व्यावसायिक कोळसा खाण लिलावातील गुंतवणुकीच्या संधींकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा  एक भाग म्हणून कोळसा मंत्रालय मुंबईत उद्या एका रोड शोचे आयोजन करणार आहे. मुंबईत ताज महाल पॅलेस हॉटेलजवळ या रोड शोचे आयोजन होणार आहे. या कार्यक्रमाला कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त, कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार यांच्यासह मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी उपस्थित राहतील.

कोलकाता येथील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता या क्षेत्रातील संधी आणि सहभागासाठी निर्माण झालेले वातावरण मुंबईच्या दिशेने आणि त्यानंतर अहमदाबादच्या दिशेने विस्तारत आहे. आगामी काळातील लिलाव, महत्त्वाच्या धोरणात्मक सुधारणा, व्यवसायसुलभता आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे आर्थिक प्रोत्साहनलाभ याची माहिती या रोड शोंच्या माध्यमातून संबंधितांना उपलब्ध होणार आहे.

कोळसा मंत्रालय, कोल इंडिया लिमिटेड आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी प्रमुख कोळसा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींविषयीची माहिती सादर करतील आणि या उद्योगातील अग्रणींसोबत संवाद साधतील, नियामक चौकटी आणि भारताच्या ऊर्जा भवितव्याच्या सुरक्षिततेमध्ये कोळसा क्षेत्राच्या महत्त्वाच्या भूमिकेवर चर्चा करतील. या उद्योगातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यामधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी उपक्रमांच्या मालिकेचा एक भाग म्हणून मुंबईत हा रोड शो आयोजित होत आहे. तंत्रज्ञानविषयक नवोन्मेष, शाश्वतताविषयक उपाययोजना आणि कोळसा खननातील पर्यावरणपूरक सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा घडवून आणण्यावर या कार्यक्रमाचा प्रमुख भर असेल.  सर्व हितधारक, गुंतवणूकदार आणि उद्योग धुरीण यांनी या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडून त्यांना अतिशय आग्रहाने आमंत्रित केले जात आहे. या परिवर्तनकारी प्रवासात सहभागी होऊन त्यातील सहभागी एका प्रतिरोधक, प्रगतीशील आणि स्वयंपूर्ण कोळसा क्षेत्राला आकार देण्यात योगदान देतील. ज्यामुळे या क्षेत्रातील शाश्वतता आणि नवोन्मेषाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करून भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.

 
S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2106581) Visitor Counter : 34


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil