नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अॅडव्हांटेज आसाम 2.0 या शिखर परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल  यांनी आसाममधील देशांतर्गत जलमार्गांचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी 4,800 कोटी रुपयांच्या योजनांची केली घोषणा


केंद्र सरकार ब्रह्मपुत्र नदीवर 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नदी दीपगृह (Riverine Lighthouses) उभारणार – सर्बानंद सोनोवाल

Posted On: 26 FEB 2025 4:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज गुवाहाटी इथे आयोजित अॅडव्हान्टेज आसाम 2.0 या गुंवणूक शिखर परिषदेत आसाममधील अंतर्देशीय जलमार्ग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी 4,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा केली. सर्बानंद सोनोवाल यांनी आज या परिषदेच्या दुसऱ्या दिवशीआसाममधील  रस्ते, रेल्वे आणि नदी पर्यटन या विषयावरील सत्राला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने आसाममध्ये दूरवर विस्तारलेल्या तिथल्या बहुआयामी जलमार्गांत दडलेल्या अफाट क्षमतांचा उपयोग करून, या क्षेत्राची वाढ आणि विकास करणे हा या गुंतवणुकीचा उद्देश असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

या शिखर परिषदेत सर्बानंद सोनोवाल यांनी हरित नौका योजनेअंतर्गत 2030 पर्यंत हरित नौकांमध्ये नियोजित परिवर्तन घडवून आणण्यासाठी 1,500 कोटी रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली. राष्ट्रीय जलमार्ग 2 (NW2) आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 (NW16) वर 2027-28 पर्यंत क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच या मार्गावरील मालवाहतूक क्षमतेत वाढवण्यासाठी 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची तरतूद केली असल्याचेही त्यांनी सांगितले. याअंतर्गत सिलघाट, बिश्वनाथ घाट, नेमती घाट आणि गुइजान इथे जेट्टी उभारण्यासह, किनारपट्ट्यांवर विविध पायाभूत सुविधा उभारण्याचे काम केले जाणार आहे. याचबरोबरीने याअंतर्गत गुवाहाटीतील फॅन्सी बाजार इथे प्रादेशिक कार्यालय, सागरी कौशल्य विकास केंद्र (MSDC), विश्रामगृह आणि आयकर अपीलेट ट्रिब्युनल (ITAT) चे कार्यालय उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पांडू इथे जहाज दुरुस्ती विषयक सुविधेच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी 375 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारने जलमार्गाच्या देखभालीसाठी, बांगलादेश सीमेपातून ते पांडूपर्यंत जलमार्ग NW-2 अंतर्गत 2.5 मीटर खोली निश्चित करण्याची जबाबदारी ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DCI) ला दिली आहे, हे कामही 2026 - 27 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सोनावाल यांनी दिली. या कामासाठी 191 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुवाहाटी आणि धुबरी इथे वॉटर मेट्रो सेवा विकसित करण्यासाठी 315 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीचीही घोषणा केली. कोची मेट्रो सेवेच्या यशाच्या आधार घेत या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला जात असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले. यावेळी सर्बानंद सोनोवाल यांनी कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे (CSL) तयार केल्या जात असलेल्या दोन विद्युत चालित द्विहल नौका (Electric Catamarans)  तैनात करणार असल्याची घोषणाही केली. याचबरोबरीने गुवाहाटी इथे 100 कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिब्रुगढमधील, रिजनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या (RCOE) विकासासाठी अंदाजे 120 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. याशिवाय भांडवली विकासात आणखी भर घालून, ब्रह्मपुत्रेच्या(NW2)  बाजूने 100 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात - बोगीबील, बिस्वनाथ, निमाती, पांडू आणि सिलघाट या पाच ठिकाणी नदी दीपगृहे बांधली जातील.  याव्यतिरिक्त, पांडू आणि बोगीबील दरम्यान 2.5 मीटरच्या LAD सह फेअरवे  विकासासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवले आहेत.ब्रह्मपुत्रा (NW2) साठी दोन कटर सेक्शन ड्रेजर युनिट देखील खरेदी केले जातील.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग (MoPSW) मंत्रालयाच्या अंतर्गत,भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने (IWAI),आसाममध्ये राष्ट्रीय जलमार्गांसह नद्यांतून वाहतूक करण्यासाठी  ब्रह्मपुत्रा (NW2) आणि बराक नदी (NW16) या नद्यांच्या काठी 1,010 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प राबवत आहे. यातील प्रमुख प्रकल्पांपैकी, पांडा येथे 208 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने जहाज दुरुस्तीसाठी सोय केली जात आहे, तर पांडू ते NH27 हा पर्यायी रस्ता 180 कोटी रुपयांची गुंतवणुक करत बांधला जात आहे.बोगीबील तसेच जोगीघोपा येथे 66 कोटी  आणि  82 कोटी रुपये गुंतवणुकीसह) ब्रह्मपुत्रेवर ‘संभाव्यता पूर्ण करण्याच्या संधी सक्षम करण्यासाठी’नवीन अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनल (IWTविकसित केले जात आहेत, असे  सोनोवाल पुढे म्हणाले.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या सागरमाला योजनेंतर्गत ब्रह्मपुत्रा ओलांडून नदीपात्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 646 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. बराक नदीसाठी, सर्वेक्षण जलवाहिनीची खरेदी, तीन उभयचर ड्रेजरची खरेदी, करीमगंजमध्ये तरंगत्या टर्मिनलची  सुविधा उपलब्ध करण्यासाठी क्रेन पाँटून आणि गँगवे बांधणे त्याचप्रमाणे बदरपूर येथे तरंगत्या टर्मिनलची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्टील पाँटून आणि गँगवे बांधण्याचीही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी घोषणा केली.

***

S.Patil/T.Pawar/S.Patgonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2106502) Visitor Counter : 32