संरक्षण मंत्रालय
हिंद महासागर क्षेत्रातील लढाऊ ताकद वाढवण्यासंदर्भातील चर्चासत्रात हवाई दल आणि नौदलाच्या समन्वित संचालनाच्या आवश्यकतेवर सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी दिला भर
Posted On:
25 FEB 2025 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2025
दक्षिण हवाई कमांड मुख्यालयाने सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजच्या सहयोगाने 'हवाई दल आणि नौदलाचा समन्वय : हिंद महासागर क्षेत्रात लढाऊ ताकद वाढवणे' या विषयावरील चर्चासत्राचे 25 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन केले होते. या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान उपस्थित होते. हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एसपी धारकर हेदेखील यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी जागतिक सुरक्षा परिस्थितीच्या सध्याच्या पार्श्वभूमीवर सज्ज आणि दक्ष राहण्याची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित केली. हिंद महासागरात भारताचे वैशिष्टयपूर्ण भौगोलिक स्थान असून यामुळे सागरी क्षेत्र महत्त्वाचे सामरिक हिताचे क्षेत्र ठरते, यावर त्यांनी भर दिला. संयुक्त सैन्य परिचालनाचे महत्त्व अधोरेखित करून क्षेत्रात प्रतिरोध सुनिश्चितता आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण यासाठी यासाठी हवाई आणि नौदल शक्तीतील समन्वयावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानविषयक प्रगती, धोरणात्मक भागीदारी आणि संयुक्त परिचालन सराव देशाची संरक्षण स्थिती अधिक बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका कशी बजावतील, हे त्यांनी विशद केले.
Y620.jpg)
एअर मार्शल एस.पी. धारकर यांनी आपल्या बीजभाषणात, या क्षेत्रातील उदयोन्मुख धोक्यांवर मात करण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांच्यातील रिअल-टाइम गुप्तवार्ता आदानप्रदान आणि अखंड समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
सागरी आणि हवाई मोहिमांमध्ये समन्वय आणि लढाऊ ताकद वाढवणे, यावर सहभागीनी चर्चा केली आणि संयुक्त परिचालन क्षमता बळकट करण्यासंदर्भात मौल्यवान विचार आणि अंतर्दृष्टी प्रदान केली. चर्चेत आधुनिक हवाई-समुद्र युद्ध रणनीती, सागरी सुरक्षेत मानवरहित प्रणालींची भूमिका आणि संरक्षण सज्जतेवर उदयोन्मुख भू-राजकीय गतिशीलतेचा प्रभाव यांचा समावेश होता. हिंद महासागर क्षेत्रात धोरणात्मक फायदा राखण्यासाठी सैन्य सज्जता आणि संसाधन वाटप यांच्या इष्टतमीकरणाबाबत तज्ज्ञांनी शिफारसीदेखील दिल्या.
हिंद महासागर क्षेत्रात भारताची धोरणात्मक भूमिका पुढे नेणे आणि आंतर-सेवा सहकार्याला चालना देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांची प्रतिबद्धता या कार्यक्रमाने पुन्हा अधोरेखित केली. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने सर्वोत्तम पद्धती आणि विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील संबधितांकरिता मंच या कार्यक्रमाने पुरवला. भविष्यातील सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सातत्यपूर्ण सहयोग, निरंतर आधुनिकीकरण आणि क्षमता वाढीवर अढळ लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता यावर मतैक्य होऊन चर्चासत्राचा समारोप झाला.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2106269)