श्रम आणि रोजगार मंत्रालय
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली पहिल्या जी 20 रोजगार कार्यगट बैठकीत भारताचा सहभाग
व्यवसाय आणि कौशल्यांच्या आंतरराष्ट्रीय संदर्भ वर्गीकरणावरील व्यवहार्यता अभ्यासाला गती देण्यासाठी आयएलओ आणि ओईसीडी सोबत द्विपक्षीय बैठकांचे आयोजन
Posted On:
21 FEB 2025 4:22PM by PIB Mumbai
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखालील पहिली जी 20 रोजगार कार्यगट (ईडब्ल्यूजी) बैठक आज 21 फेब्रुवारी 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ येथे संपन्न झाली. (i) समावेशी वाढ आणि युवा सक्षमीकरण आणि (ii) कामाच्या समावेशक भविष्यासाठी सामाजिक सुरक्षा आणि डिजिटलायझेशन सारख्या रोजगार कार्यगटाच्या प्राधान्यक्रमांवर ईडब्ल्यूजी बैठकीच्या कार्य सत्रांमध्ये चर्चा झाली.

चार दिवसांच्या या बैठकीदरम्यान, जी 20 सदस्य आणि आमंत्रित राज्यांच्या प्रतिनिधींनी जी 20 श्रम आणि रोजगार ट्रॅकच्या प्रमुख लक्षवेधी क्षेत्रांवर आंतरनिरसन आणि सादरीकरणे केली. सचिव (श्रम आणि रोजगार) सुमिता डावर यांनी भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले आणि दोन्ही प्राधान्यक्रमांवर भारताची भूमिका मांडली. सचिवांनी भारतातील वाढती सामाजिक सुरक्षा व्याप्ती, रोजगारातील वाढते कार्यबल यावर पुराव्यावर आधारित दृष्टिकोन, तसेच कामगार कल्याणासाठी भारताने तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यासाठी एनसीएस आणि ईश्रम वरील अध्ययन अहवाल सादर केला.
(i) असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामील करून घेणे आणि ईश्रम वर राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे, आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये कामगारांची उपलब्धता वाढविण्यासाठी पोर्टलचा वापर करणे; (ii) नियोक्ते, नोकरी शोधणारे, समुपदेशन आणि कौशल्य सेवा इत्यादी विविध हितधारकांचा मेळ घालून श्रम बाजारातील पुरवठा-मागणी यांची सांगड घालण्यासाठी राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) पोर्टलचा वापर यासारख्या भारतीय तंत्रज्ञानाच्या परिवर्तनकारी वापरावर श्रम सचिवांनी प्रकाश टाकला. ईश्रम आणि एनसीएस या दोन्हीवर अध्ययन अहवाल सादर करण्यात आला ज्याद्वारे श्रम बाजारातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या प्रगतीबाबत जी 20 सदस्य देशांच्या प्रतिनिधींना स्वारस्य वाटले.
अध्ययन अहवाल 1: ईश्रम पोर्टल
भारताने ईश्रम पोर्टल एक अध्ययन अहवाल (केस स्टडी) म्हणून सादर केले, ज्यामध्ये असंघटित आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी एक व्यापक राष्ट्रीय डेटाबेस म्हणून त्याची भूमिका दर्शविली गेली, जेणेकरून 'वन-स्टॉप-सोल्यूशन' म्हणून सामाजिक सुरक्षा फायद्यांमध्ये अखंड प्रवेश सुनिश्चित होईल.
अध्ययन अहवाल 2: राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) पोर्टल
नोकऱ्या-कौशल्यांमधील तफावत भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे सादरीकरण एनसीएस पोर्टलवरील केस स्टडीद्वारे करण्यात आले.
2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील पाठपुराव्याला प्रतिनिधिमंडळाने प्राधान्य दिले आहे, ज्यामध्ये कौशल्ये आणि पात्रतांच्या परस्पर मान्यतेसाठी आंतरराष्ट्रीय चौकट विकसित करणे समाविष्ट आहे. त्यानुसार, पहिल्या जी 20 ईडब्ल्यूजी बैठकीच्या अनुषंगाने, भारताने आयएलओ, ओईसीडी आणि जर्मनीसोबत कौशल्य तफावत निर्देशन व्यवहार्यता अभ्यास, त्याची कार्य योजना आणि कालमर्यादा याबाबत द्विपक्षीय चर्चा केली.
निधी, अध्ययन पूर्ण करण्यासाठी आयएलओ सोबतच्या कराराची स्थिती आणि संबंधित हितधारकांशी सहकार्य यासंबंधीच्या नवीनतम अद्यतनांची माहिती सचिवांनी दिली. माहिती तंत्रज्ञान, हरित रोजगार आणि सेवा संबंधित भूमिका या तीन प्रमुख क्षेत्रांवर व्यवहार्यता अध्ययन लक्ष केंद्रित करेल यावर सहमती झाली.
भारताचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आणि पुढील दशकात भारत वाढत्या जागतिक कार्यबल आवश्यकता पूर्ण करेल असा अंदाज पाहता, पात्र भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय गतिशीलतेच्या सुलभतेसाठी हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे.
नेदरलँड्ससोबत द्विपक्षीय चर्चा
नेदरलँड्ससोबत द्विपक्षीय चर्चा झाली, ज्यामध्ये भारताचा बहुआयामी गरिबी निर्देशांक (एमपीआय) आणि राहणीमान सुधारण्यासाठी 'राहणीमान वेतन' या संकल्पनेद्वारे गरिबी दूर करण्याच्या जागतिक प्रयत्नांशी त्याचे संरेखन यावर भर देण्यात आला.
जर्मनीसोबत द्विपक्षीय चर्चा
जर्मनीसोबत द्विपक्षीय चर्चेदरम्यान, ऑक्टोबर 2024 मध्ये भारताने जर्मनीसोबत केलेल्या संयुक्त स्वारस्य घोषणापत्राचे (जेडीआय) महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2105357)
Visitor Counter : 20