आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रायफेडने मीशो, आयएफसीए आणि महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था यांच्यासोबतच्या सामंजस्य करारांवर केल्या स्वाक्षऱ्या

Posted On: 19 FEB 2025 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025

 

बी टू सी म्हणजेच व्यापार ते ग्राहक दृष्टीकोनाकडून बी टू बी म्हणजेच व्यापार ते व्यापार दृष्टीकोनाचा स्वीकार करण्याकडे वाटचाल करण्याच्या लक्षणीय उद्देशासह ट्रायफेड म्हणजेच भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने आदिवासी व्यवसायांमध्ये सुलभता आणण्यासाठी मीशो, भारतीय पाककला संस्थांचा महासंघ (आयएफसीए) आणि महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमजीआयआरआय) या संस्थांशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. बीटूबी दृष्टीकोनाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तसेच आदिवासी उत्पादनांच्या बाजारपेठेत वाढ करण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल उचलत, 16 ते 24 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडागारात आयोजित करण्यात आलेल्या ‘आदी महोत्सव’ या महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान 18 फेब्रुवारी रोजी या संदर्भातील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

मीशोच्या समाजमाध्यमावरील व्यापारविषयक मंचावर आदिवासी उत्पादनांचा प्रवेश सुलभ व्हावा तसेच आदिवासी पुरवठादारांसाठी यासंदर्भातील प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती उपक्रम आयोजित केले जावेत, हा मीशोसोबत ट्रायफेडने केलेल्या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे, तर भारतीय पाककला संस्थांचा महासंघ (आयएफसीए) त्यांच्या तंत्रज्ञान मंचाच्या माध्यमातून पाककला विषयातील व्यावसायिक आणि हॉटेलच्या श्रुंखलांसोबत दीर्घकालीन सहयोगी संबंध स्थापित करण्यात मदत करेल. महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेने (एमजीआयआरआय) कारागीरांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे तसेच क्षमता निर्मिती करणे यासाठी ज्ञानाबाबतचा भागीदार म्हणून भूमिका निभावण्यासाठी ट्रायफेड सोबत भागीदारी केली आहे.

ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चॅटर्जी यांच्या उपस्थितीत, ट्रायफेडच्या महाव्यवस्थापकांनी अनुक्रमे मीशोच्या सार्वजनिक धोरण आणि सरकारी व्यवहार विभागाच्या प्रमुख प्राची भूचर, आयसीएफएचे शेफ मनजित गिल आणि एमजीआयआरआयचे संचालक डॉ. आशुतोष ए. मुरकुटे यांच्यासोबत देशभरातील आदिवासी समुदायांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी विविध पैलूंच्या संदर्भात केलेल्या या सामंजस्य करारांचे आदानप्रदान केले.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम, केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गा दास ऊईके, संसद सदस्य बांसुरी स्वराज यांच्या सन्माननीय उपस्थितीत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे 16 फेब्रुवारी 2025 रोजी उपरोल्लेखित महोत्सवाचे उद्घाटन केले होते.

 

* * *

M.Pange/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2104698) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil