राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कतारच्या अमीरांच्या सन्मानार्थ केले मेजवानीचे आयोजन
भारत आणि कतारने केवळ आपल्या नागरिकांच्याच नव्हे तर जगातील सर्व लोकांच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र काम केले पाहिजे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
18 FEB 2025 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट घेतली. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपतींनी मेजवानी देखील आयोजित केली होती.

भारताच्या दुसऱ्या राजकीय भेटीवर अमीर अल थानी यांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचे कतारशी असलेले संबंध शतकानुशतके जुने आहेत. कतार हा पश्चिम आशियातील भारतासोबतच्या व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांचा अविभाज्य भाग आहे.
दोन्ही देशांनी केवळ आपल्या नागरिकांच्याच नव्हे तर जगातील सर्व लोकांच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र काम केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
भारत-कतार संबंध 'धोरणात्मक भागीदारी'च्या पातळीवर नेल्याने अधिक जवळच्या संबंधांसाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार होईल यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
JPS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104691)
Visitor Counter : 16