ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावे एका संस्थेद्वारे खोटी नोकर भरती प्रक्रिया

Posted On: 17 FEB 2025 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2025

राष्ट्रीय ग्राम विकास आणि सामाजिक मनोरंजन अभियान (National Rural Development & Recreation Mission - NRDRM) या नावाच्या संस्थेने केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावाने नोकर भरतीची खोटी आणि फसवी जाहीरात दिली आहे. याविषयी जनतेत जागृती करण्याकरता केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या संस्थेने डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली, 110001 या पत्त्यावर आपले कार्यालय असल्याचा दावा केला आहे, तसेच www.nrdrm.com (http://www.nrdrm.com) आणि www.nrdrmvacancy.com (http://www.nrdrmvacancy.com) ही आपली संकेतस्थळे असल्याचेही म्हटले आहे. मात्र या दाव्यात नमूद अशा प्रकारची कोणतीही संस्था आणि संकेतस्थळे आपल्या अखत्यारीत कार्यरत नसल्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला कळवले जात आहे  की इथे नमूद राष्ट्रीय ग्राम विकास आणि सामाजिक मनोरंजन अभियान (National Rural Development & Recreation Mission - NRDRM) या संस्थेद्वारा किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांद्वारा केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावे राबवलेली नोकर भरतीशी संबंधित कोणतीही प्रक्रिया ही पूर्णतः खोटी आणि फसवी असून अशा कोणत्याही प्रक्रियेला केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे कसल्याही प्रकारचे समर्थन नाही. 

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय त्यांच्याद्वारा राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही अधिकृत नोकर भरती प्रक्रियेसाठी, कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया शुल्क वा इतर कोणतेही शुल्क आकारत नाही, तसेच अर्जदारांच्या बँक खात्यांविषयीचे तपशीलही मागत नाही. तसेच rural.gov.in हेच केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ असून, या  विभागातील भरतीशी संबंधित माहिती याच संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते.


S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2104130) Visitor Counter : 59