कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी योजना


नामांकनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत वाढ, अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2025

Posted On: 15 FEB 2025 4:07PM by PIB Mumbai

 

ई गव्हर्नन्स 2025 या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नोंदणी व नामांकनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 रोजी सुरू झाली.

खालील श्रेणींमध्ये नामांकनपत्रे मागविण्यात आली आहेत -

श्रेणी (I) – डिजिटल रुपांतरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन सरकारी प्रक्रियेचे पुनर्आरेखन. या श्रेणीमध्ये 4 पुरस्कार दिले जातील.

श्रेणी (II) – नागरिक केंद्रित सेवांसाठी कृत्रिम प्रज्ञा व अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून नवकल्पना राबविणे. या श्रेणीमध्ये 3 पुरस्कार दिले जातील.

श्रेणी (III) – सायबर सुरक्षेसंदर्भात सर्वोत्तम इ गव्हर्नन्स सेवा. या श्रेणीअंतर्गत 3 पुरस्कार देण्यात येतील.

श्रेणी (IV) – उपक्रमांवर भर देत सेवा पुरवठ्याची व्यापकता वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर राबविले जाणारे उपक्रम. या श्रेणीमध्ये 4 पुरस्कार दिले जातील.

श्रेणी (V) – इ गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार, पंतप्रधान सर्वोत्कृष्टता पुरस्कार आणि केंद्रिय मंत्रालयाकडून दिले जाणारे पुरस्कार मिळालेले राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त यशस्वी प्रकल्पांचे राज्य / केंद्रशासित प्रदेश / जिल्हा पातळीवर अनुकरण व त्यांच्या व्यापकतेत वाढ करणे. या श्रेणीअंतर्गत 1 पुरस्कार दिला जाईल.

श्रेणी (VI) – केंद्रिय मंत्रालये / राज्ये / केंद्रशासित प्रदेश यांच्याद्वारे डिजिटल मंचावरील माहितीचा वापर करुन डिजिटल रुपांतरण.या श्रेणीअंतर्गत 1 पुरस्कार दिला जाईल.

अर्जदारांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीची गरज लक्षात घेऊन आणि विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या विनंतीपत्रांचा विचार करुन, या पुरस्कारांसाठी (https://nceg.gov.in/) या संकेतस्थळावर राष्ट्रीय इ गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत नोंदणी करण्याची व नामांकनपत्र दाखल करण्याची मुदत 28.02.2025 (रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत) वाढविण्यात आली आहे.

***

S.Kane/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2103579) Visitor Counter : 66


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil