गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
स्मार्ट आणि शाश्वत शहरीकरणावरील चौथ्या भारत-युरोपियन युनियन शहरी मंचात, स्मार्ट आणि शाश्वत शहरीकरणावर सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत-युरोपियन युनियनमध्ये सहमती
Posted On:
13 FEB 2025 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025
स्मार्ट आणि शाश्वत शहरीकरणासाठी भागीदारीवरील 2017 च्या संयुक्त घोषणेवर आधारित, चौथा भारत - युरोपियन युनियन शहरी मंचाचे आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आले. हा मंच शाश्वत शहरी विकासावरील भारत-युरोपियन युनियन सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उच्च-स्तरीय कार्यक्रमाने भारत, युरोपियन युनियन (ईयू) आणि त्याच्या सदस्य राष्ट्रांमधील अधिकारी तसेच तज्ञांना शाश्वत शहरी विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोनाने काम करण्यासाठी धोरणे आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणले होते. या कार्यक्रमामुळे भारतातील युरोपियन युनियनच्या जागतिक प्रवेशद्वार बनण्याच्या धोरणाला बळकटी मिळाली आहे.
या मंचाने लिंगभाव-समावेशक, अनुकूल आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी परिवर्तनात्मक उपक्रम आणि नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणांचा शोध घेतला, यात तीन प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले : भारतीय शहरांमध्ये शहरी आघाडी आणि एकात्मिक दृष्टिकोन, शहर पातळीवर नवोन्मेष आणि चक्रीयतेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक सक्षमकर्ता म्हणून समावेशक शहरी गतिशीलता.

जागतिक ऊर्जेचा वापर, उत्सर्जन आणि प्रदूषणाचा दोन तृतीयांश भाग शहरी भागांमुळे असल्याने, भारत - युरोपियन युनियन सहकार्य महत्त्वाचे आहे. 2017 पासून, भारत - युरोपियन युनियन सहकार्य शाश्वत शहर प्रारुप, सार्वजनिक-खाजगी गुंतवणूक, हवामान कृती आणि आपत्ती जोखीम कमी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. टीम युरोपने 40 हून अधिक भारतीय नगरपालिकांशी संपर्क साधला असून या शहरांची हवामान-स्मार्ट विकासाची समज वाढवली आहे तसेच शहरी गतिशीलता उपाय, कचरा व्यवस्थापन आणि हवामान कृती नियोजनाला पाठिंबा दिला आहे.
भारतातील युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाचे राजदूत हार्वे डेल्फिन यांनी शहरी विकासात भारत - युरोपियन युनियन सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “2017 पासून युरोपियन युनियन भारतीय शहरांच्या विकासाच्या नियोजनात भारत सरकारला साथ देत आहे तसेच पाठिंबाही देत आहे. योग्य धोरणे लागू केल्याने, शहरीकरण ही शाश्वततेसाठी एक मोठी संधी असू शकते” असेही ते म्हणाले. “स्मार्ट आणि शाश्वत शहरीकरण आमच्या भागीदारीचा केंद्रबिंदू असून शहरांचे इको-डिझाइन सुधारणे; कचरा विल्हेवाट सुधारणे, पाण्याचा पुनर्वापर सुधारणे; महानगरांना वित्तपुरवठा करून शहरी गतिशीलता सुलभ करणे ही कामे या भागीदारीतून केली जाणार आहेत.” असेही त्यांनी सांगितले.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2103011)
Visitor Counter : 24